Friday, 22 July 2016

MPSC Geography:

MPSC Geography:
🔹मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.

भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.

खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.

निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.

भारतात आढळ

णाऱ्या खरफुटींचे जवळजवळ २० टक्के क्षेत्र अंदमान आणि निकोबार बेटांवर असून हे भारताचं सुंदरबननंतरचं दुसरं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. इथे खारफुटीची जंगले २८३ वर्ग किलोमीटर क्षेत्रांत व्यापली आहेत. या क्षेत्रांत ४६ टक्के एवढे क्षेत्र अत्यंत दाट खारफुटीचे आहे. ४२ टक्के मध्यम आणि १२ टक्के क्षेत्र विरळ खारफुटीचे आहे.
खरफुटींच्या संरक्षण-संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य अंदमानच्या धानीनल्लाह या ठिकाणी अंदाजे दीड किमी लांबीचा नॅचरल मॅनग्रोव वॉक वे बनविण्यात आला आहे. इथे आपण प्रत्यक्ष दाट खारफुटीच्या जंगलातून किनाऱ्यापर्यंत जातो. धानीनल्लाह इथे कासवांची अंडी घालण्याची ठिकाणेही आहेत, इथे त्यांच्या त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे.

अंदमान आणि निकोबारची जंगलं फक्त प्रेक्षणीय नाहीत, तर श्रवणीयही आहेत, मग ती वर्षांवने असोत की खारफुटीची. तुम्ही कुठेही थांबून शांतपणे ऐकलं तर इथल्या जीवसृष्टीचं संगीत आणि लयबद्ध जीवन अनुभवू शकता. या सुंदर जीवसृष्टीच्या मागचा कणा आहे इथला मान्सून, जो भरभरून मुक्तहस्ताने अमृताचा वर्षांव करत आला आहे आणि पुढेही करत राहील. गरज आहे त्याला समजून घेण्याची आणि त्याला अनुसरून वागण्याची.

अंदमानातील जैवविविधता:
अंदमान आणि निकोबार ही जैवविविधतेची एक जिवंत प्रयोगशाळाच आहे. या बेटांवर एक मोठी जीवसृष्टी राज्य करते. त्यात कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव सर्व काही आहेत. या बेटांवर जवळजवळ ७१७१ वर्ग किमी एवढं वनक्षेत्र आहे. काही वृक्षांची उंची ४० ते ५० मीटपर्यंत असते, त्याचा बेस तीन मीटपर्यंत असतो. उष्ण हवामान आणि तीन हजार मिमीपेक्षा जास्त वर्षांचा पाऊस इथल्या जीवसृष्टीस एक वरदान आहे.

या बेटांवर माहीत असलेल्या जवळजवळ २२०० फुलांच्या जाती आहेत, त्यापकी २१५ या बेटांव्यतिरिक्त कुठेही आढळत नाहीत. या बेटांवर फर्नच्या १३० जाती, आíकडचे ११० प्रकार आढळतात. तर इथे पक्ष्यांच्या आजवर माहीत असलेल्या २७० प्रजाती आहेत आणि त्यांच्या पकी १०६ फक्त इथेच आढळतात. त्याव्यतिरिक्त अंदमानमध्ये १२ आणि निकोबारमध्ये नऊ पक्ष्यांच्या अशा जाती आहेत ज्यांचे क्षेत्र खूपच सीमित आहे. निकोबार मेगापोड, घरटं बनविणारी अबाबिल, आणि नारकोंडाम धनेश अशा काही संरक्षित जाती आहेत. शिवाय अंदमानी सप्रेट ईगल, निकोबार पेराकीट, अंदमानी महोक इथेच आढळणारे काही पक्षी आहेत.

इथे ७६ सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद आहे आणि त्यांच्यापकी २४ फक्त इथे विशिष्ट क्षेत्रांत आढळतात. या बेटांवर एकूण ४० जातींचे सर्प आढळतात त्यांच्यापकी १० विषारी आहेत. अंदमान नाग, अंदमान पिट वायपर, अंदमान करेत, अंदमान किलबॅक वॉटर स्नेक हे काही स्थानिक सर्प आहेत.
अंदमान आणि निकोबारला मगरींची फक्त एकच जात आढळते ती आहे खाऱ्या पाण्यातली मगर. या मगरी खारफुटींच्या क्षेत्रात राहतात. जितकं जंगलात वाघाचं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व खारफुटीच्या जंगलात मगरीचं आहे. इथल्या खाद्यशृंखलेत मगर ही सर्वोच्च स्थानावर आहे. या मगरींची लांबी सात मीटर आणि वजन एक हजार किलोपर्यंत असते.

काही संशोधकांच्या मते आज आढळणाऱ्या कासवांचा विकास जवळजवळ १२ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला असावा. अंदमानात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, किलोनिया मिडास, आणि लेदर बेक या कासवांच्या जाती आढळतात. समुद्री कासवे वर्षभरात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. ती काही विशिष्ट ठिकाणी अंडी घालायला येतात. अंदमान आणि निकोबारातली काही ठिकाणे ही त्यांची त्यासाठीची आवडती ठिकाणे मानली जातात. लेदर बॅक कासव हे जगातील सर्वात मोठं कासव आहे. त्याची लांबी तीन मीटपर्यंत असते. हे कासव खोल समुद्रात १२०० मीटपर्यंत जाते. अंदमानात रटलॅंड बेटांवर ही कासवं अंडी घालतात.

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या जीवजातींपैकी कीटकांचे प्रमाण जवळजवळ ८० टक्के आहे. फुलपाखरंदेखील कीटक याच प्रकारात मोडतात. या बेटांवर वावरणाऱ्या फुलपाखरांच्या आजवर २२५ जाती ज्ञात आहेत. यातली काही फुलपाखरं बहुतेक जगातली सर्वात मोठी आहेत. अशांपैकी दहा जातींची फुलपाखरं फक्त या बेटांवरच आढळतात. यातील काही जाती अंदमान मोर्मोन, अंदमान क्लब टेल, अंदमान स्वोर्ड टेल, अंदमान याम फ्लाय अशी आहेत. माउंट हॅरियट नेशनल पार्कच्या क्षेत्रात सर्वात जास्त फुलपाखरं दिसतात.

चालु घडामोडी २३जुलै

🌞 *चालू घडामोडी 23 जुलै 2016*🌞

🌀 *देशातील सर्वोत्तम बंदर जेएनपीटी असणार* :

🔯जेएनपीटीअंतर्गत येणारे बंदर आणि येत्या चार वर्षांत नव्याने तयार होत असलेल्या चौथ्या बंदराला आवश्यक असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

🔯 तसेच भविष्यात देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून जेएनपीटी नावारुपाला येईल.

🔯 जागतिक स्तरावर व्यापारवाढीसाठी जेएनपीटी बंदरात पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
 
🔯तसेच यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाचा समावेश आहे.
 
🔯जेएनपीटी बंदरातून सुलभपणे कंटेनर मालाची वाहतूक करण्यासाठी, चौपदरी रस्ते सहा ते आठ पदरी केले जाणार आहेत.

🔯 जेएनपीटी, राष्ट्रीय महामार्ग, सिडको यांच्यासमवेत जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

🌀 *परदेशात व्दिशतक करणारा एकमेव भारतीय कर्णधार विराट कोहली* :

🏏विराट कोहलीचे पहिले द्विशतक आणि आर. अश्‍विनच्या शतकामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 566 धावांचा लक्ष्य दिला आहे.  
 
🏏भारताने 8 बाद 566 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजची अवस्था 1 बाद 31 अशी झाली आहे.
 
🏏फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीच्या संधीचे विराटने सोने केले.
 
🏏भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत विराटने आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.
 
🏏परदेशात द्विशतक करणारा विराट हा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे.

🌀 *उत्तर कोरियाकडून तीन क्षेपणास्त्रांची चाचणी* :

🚀उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
 
🚀तसेच या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 500 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे.
 
🚀उत्तर कोरियाने नुकतेच पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे.
 
🚀उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत.
 
🚀संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
🚀उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.

🔴 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते डॉ मोहोळकर कालवश* :

🔶राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व जनता बँकेचे माजी संचालक डॉ. हरिभाऊ विठ्ठल मोहोळकर (वय 97) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
 
🔶संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेडगेवार यांच्याकडून त्यांनी संघाचे काम करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली.
 
🔶सन 1937 सालापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूरात काम करण्यास सुरुवात केली. ते दंतवैद्य होते.
 
🔶चंद्रभागा वाळवंटामध्ये शाखा सुरु करून तरुणांना संघात काम करण्याची संधी त्यांनी दिली.
 
🔶तसेच आणिबाणीच्या काळात त्यांनी 19 वर्षे कारावास भोगला.
 गोरगरीबांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी त्यांनी जनता बँकेच्या माध्यमातून काम केले.

🌀 *भारतातील काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा प्राप्त* :

✳इस्तंबूल येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.

✳ त्यानुसार युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगड व सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष यांचा समावेश आहे.
 
✳नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
 
✳याशिवाय पॅरिस येथील स्थापत्य विशारद ले कोर्बिझीयर यांनी मांडणी केलेल्या चंडीगडला वारसा ठिकाणात स्थान मिळाले आहे.
 
✳1950 मध्ये त्यांनी या शहराची रचना केली होती.
 
✳सिक्कीम नॅशनल पार्कचाही वारसा ठिकाणात समावेश केला आहे.

✳ माउंट कांचनजुंगा हे पर्वतशिखर त्यातच येते. काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडित आहेत.
 
✳तसेच या बैठकीत एकूण 7 देशातील 17 ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

        🌅 *दिनविशेष*🌅

♨ *इजिप्त क्रांती दिन*.

 ♨ *1840 : ऍक्ट ऑफ युनियनच्या अंतर्गत कॅनडा प्रांताची रचना*.
 
♨ *1881 : चिली व आर्जेन्टिना मध्ये सीमा तह*.

🔷🔷🔷🔷 *Vist*🔷🔷🔷🔷🔷
Vinupawar.blogspot.com

Wednesday, 20 July 2016

दिनविशेष

*॥ दिनविशेष ॥* 🌷       
         ●●●●●●●●●●●
           🌻  *२१ जुलै २०१६*  🌻
     【या वर्षातील २०३ वा दिवस 】           
_*====s=====v=======m====*_

☀ *१८३१* - बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
☀ *१८५३* -  ज्योतिर्विद, पाश्चिमात्य पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्मदिन.
☀ *१८९९* -  नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्मदिन.
☀ *१९१०* -  स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक वि. . पागे यांचा जन्मदिन.
☀ *१९२०* -  गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन.
☀ *१९३०* -  सांस्कृतिक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्मदिन.
☀ *१९३४* -  क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्मदिन.
☀ *१९४४* - २० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
☀ *१९४७* -  सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्मदिन.
☀ *१९६०* - सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
☀ *१९७२* -  भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुक यांचा मृत्यू.
☀ *१९७६* - आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.
☀ *१९८३* - अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
☀ *१९९४* -  इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचा मृत्यू.
☀ *१९९५* - संगीतकार व मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा मृत्यू.
☀ *१९९७* -  साहित्यिक राजा राजवाडे यांचा मृत्यू.
☀ *२००१* -  दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा मृत्यू.
☀ *२००२* - जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
☀ *२००९* -  किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचा मृत्यू.
=================
         ✍✍✍ *सुविचार* ✍✍✍
         *---------------------------------*
_*माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेच त्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते*_.       = *वि.स. खांडेकर*
येणार नाही*_.
📝✍�📝✍�📝✍�📝✍�

*चालू घडामोडी- 21 जुलै*🌞

🌞 *चालू घडामोडी- 21 जुलै*🌞

       🛳 *देश-विदेश*✈

🔷 *राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा*

🔶 अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय उमेदवारीसाठी हवी असणारी मते मिळवली आहेत.

🔶तब्बल १२३७ मताधिक्य मिळवून ट्रम्प यांनी ही उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत माजी परराष्ट्रमंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यात लढत रंगणार हे निश्चित झाले आहे.

🔶अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत क्लिंटन व ट्रम्प यांच्यातील शाब्दिक युद्ध पहायला मिळाले होते. क्लिंटन यांनी कॅलिफोर्नियातील प्रचारसभेत ट्रम्प यांची तुलना हुकूमशहाशी केली होती.

☢ *‘गुगल’वर जगातील टॉप गुन्हेगारांच्या यादीत मोदींच्या नावावरून कंपनीला नोटीस*

❇ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जगातील टॉप टेन गुन्हेगारांच्या यादीत समावेश केल्याबद्दल अलाहाबाद न्यायालयाने ‘गुगल’ कंपनी, तिचे सीईओ आणि कंपनीचे भारतातील प्रमुख यांना नोटीस बजावली आहे.

❇या प्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हेगारी खटला दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जगातील दहा प्रमुख गुन्हेगारांची नावे गुगलवर सर्च केल्यावर त्यामध्ये मोदींचा फोटो दिसत होता.

❇मोदींचे नाव हटविण्यासाठी तक्रारदाराने ‘गुगल’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘गुगल’ने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी वकील सुशीलकुमार मिश्रा यांच्यामार्फत या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली. पण हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगत त्यांची याचिका ३ नोव्हेंम्बर २०१५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

💠 *रोहित खंडेलवाल पहिला भारतीय 'मिस्टर वर्ल्ड'*

✡ नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस्टर वर्ल्ड‘ हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे.

✡साऊथपोर्ट येथील साऊथपोर्ट थिएटरमध्ये काल (मंगळवार) मोठ्या उत्साहात ‘मिस्टर वर्ल्ड 2016‘चा कार्यक्रम पार पडला.

✡ ‘मिस्टर वर्ल्ड 2016‘च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भव्य सोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या स्पर्धेत जगभरातील एकूण 47 स्पर्धक सहभागी झाले होते. रोहित खंडेलवाल याने या किताबासह 50 हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले. निवेदिता साबू यांनी डिझाईन केलेला टक्सिडो रोहितने यावेळी परिधान केला होता. मिस्टर वर्ल्ड जिंकून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल रोहित खंडेलवाल याच्यावर भारतीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        🌀 *अर्थशास्त्र* 🌀

🔴 *सरकारी बँकांना २३ हजार कोटींची भांडवली मदत*

 ✳बुडित कर्जाच्या भयंकर ताण असलेल्या देशातील सार्वजनिक बँकांना सरकारने भांडवली सहाय्यतेचा पहिला हप्ता म्हणून २२,९१५ कोटी रुपये मंगळवारी देऊ केले. विविध १३ बँकांना भांडवली पूर्ततेसाठी हा निधी वापरात येईल.

✳सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता चालू आर्थिक वर्षांतील हा पहिला अर्थसहाय्याचा टप्पा आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तळात गेलेला पतपुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेसह पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आदी बँकांना ७,५०० कोटी रुपयेपर्यंतची रक्कम मिळणार आहे. सरकारी अर्थसहाय्याचा सर्वाधिक हिस्सा देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेच्या वाटय़ाला आला आहे. बँकेला ७,५७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. १,००० ते ३,००० कोटी रक्कम सहा बँकांना मिळाली आहे. सर्वात कमी, ४४ कोटी रुपये देना बँकेला मिळाले आहेत.
Vinupawar.blogspot.com