यलो स्टोन हा खूप मोठा ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेला जमिनीचा भाग आहे. या पार्कची निर्मिती १ मार्च १८७२ मध्ये झाली. यलो स्टोन आणि स्नेक नदीच्या प्रवाहामुळे ज्या पिवळ्या रंगाच्या दगडांच्या प्रचंड अशा इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या घड्या तयार झालेल्या आहेत, त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर म्हणजे ‘येलो स्टोन नॅशनल पार्क.’
अमेरिकेतील व्योमिंग, मोंटाना आणि इडाहो या तीन राज्यांमध्ये येलो स्टोन पसरले आहे. त्यातील ९६ टक्के भाग व्योमिंगमध्ये आहे. एकंदर २२, १९, ७८९ एकरचा हा परिसर आहे.
जगातील जवळजवळ अर्धे भूऔष्मिक वैशिष्ट्ये येलो स्टोनमध्ये आहेत. खूप मोठे जंगल, गरम पाण्याचे ज्वालामुखीजन्य झरे, फवारे, गवताळ कुरणे, वनस्पतींच्या दुर्मीळ जाती, प्रजाती येथे आहेत. अस्वले, कोल्हे, एल्क, रानगवे असे प्राणी आहेत. एकूण २९० धबधबे आहेत.
Vinupawar.blogspot.com
Friday, 1 July 2016
भुगोल नोट्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment