Monday, 11 July 2016

MPSC Science:    (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

MPSC Science:
   (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

 ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.

 कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.

 फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.

 लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.

 आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.

 आपल्या मानेत असणार्‍या अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.

 प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्‍या रासायनिक पदार्थांना संप्रेरके म्हणतात.

 जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.

 किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.

 आम्ल –    चवीला आंबट असतात. H हा मुख्य घटक असतो.

आम्लाच्या द्रावणात नीळा लिटमस लाल होतो.

आम्लारी -चवीला तुरट असतात. OH हा मुख्य घटक असतो.

आम्लारीच्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो.

दर्शके -एखादा पदार्थ आम्ल किंवा आम्लारी हे ओळखण्यासाठीवापरण्यात येणारे पदार्थ. उदा. लिटमस, हळद, मिथिलऑरेंज, फिनोल्फ्थॅलिन.      

निसर्गात आढळणारे दर्शक – लिटमस, हळद

लिटमस हा दर्शक लायकेन वनस्पतीपासून मिळवतात.

पाण्यात विरघळणारर्‍या आम्लरींना अल्कली म्हणतात.

 लिंबू, संत्री, मोसंबी, या फळात सायट्रिक अॅसिड असते.

 जेव्हा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत चुनकळी टाकतात. जर जमीन आम्लारीधर्मी असेल तर जमिनीत सेंद्रिय द्रव्ये मिसळतात.

 ४ C ला पाण्याची घनता महत्तम असते.

 जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.

 लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.

रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा

उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.

 थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता   दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.

 गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना थर्मोवेयर म्हणतात.

 उष्णतेचे सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.  

उष्णतेचे दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.

 रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया रक्त पराधन होय.

 रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.

वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला डायलेसिस (व्याष्लेषण) म्हणतात.

 बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

 आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

 कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

 परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

 जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

 विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

 हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

 आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ - पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.    
                  
 – तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.

 – पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.

– जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.                             

– पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते.

 प्रथिने –    तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात.    
                                  
 - विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

 स्निग्ध पदार्थ -   तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.        
                 
 -  स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

 पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 रेफ्रीजरेटरमध्ये 5℃ च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते.

 मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.

 चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेसंस्था असे दोन गट पडतात

.

 मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.

 चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.

 चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.

 शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.

 चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.

 काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.

 अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क, पाईनी, हृदोधिष्ठ.

 सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.

 पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना अल्कली म्हणतात.

 सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.

 उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.

 जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट (NaNO३) आणि सोडीयम सल्फेट (Na२SO४) ही उदासिन क्षारांची उदाहरण आहेत.

 दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात. अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.
____________________________
Vinupawar.blogspot.com

No comments:

Post a Comment