Wednesday, 13 July 2016

ЁЯМЮ *рдЪाрд▓ू рдШрдбाрдоोрдбी (13 рдЬुрд▓ै  2016)*ЁЯМЮ

🌞 *चालू घडामोडी (13 जुलै  2016)*🌞

🔵 *मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर* :

✳यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला 21 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

✳ मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून विविध ठिकाणी अभ्यास केंद्रातूनही माहिती दिली जाणार आहे.
 
✳पदवी, पदव्युत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे निकाल मिळालेले नाहीत, त्यांनी पुढील वर्षासाठी कायम नोंदणी क्रमांकाचा वापर करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे.
 
✳साळुंखे म्हणाले की, मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीचे नियमित प्रवेश हे 21 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन नोंदणी करून घेता येतील.
 
✳तसेच विलंब शुल्कासह 1 ते 15 सप्टेंबर आणि अतिविलंब शुल्कासह 16 ते 30 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल.

🔵 *ऑलिंपिकसाठी हॉकी गोलरक्षक श्रीजेश भारताचा कर्णधार* :

🔯पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची धुरा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्याची घोषणा (दि.12) करण्यात आली.
 
🔯गेल्या महिन्यात चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद पटकाविले होते.
 
🔯तसेच गेल्या काही महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रित सिम्ग आणि सुरेंदर कुमार या तरुण खेळाडूंना ऑलिंपिकसाठी निवड समितीने संधी दिली आहे.
 
🔯या संघामध्ये श्रीजेश हाच एकमेव गोलरक्षक असेल. मात्र ऑलिंपिक स्पर्धेच्या नियमांनुसार, संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा घेण्यासाठी दोन अतिरिक्त राखीव खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली आहे.

🔵 *उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदी राज बब्बर* :

☢विधानसभा निवडणूक होणार असलेल्या उत्तर प्रदेशात राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेता व खासदार राज बब्बर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
☢पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी (दि.12) ही माहिती दिली.
 
☢प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात प्रचार करणार का? या प्रश्नाचे थट उत्तर न देता, आझाद म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये प्रत्येक जण ठरावीक भूमिका बजावत असतो व यापुढेही तेच कायम राहील.'
 
☢आग्रा येथे जन्मलेले राज बब्बर त्या राज्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. सध्या ते उत्तराखंडमधून राज्यसभा सदस्य आहेत.

🔵 *जेरोम टेलरची क्रिकेट कसोटीतून निवृत्ती* :

🏏भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वीच वेगवान गोलंदाज जेरोम टेलर याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्याने वेस्ट इंडीजच्या संघाला धक्का बसला आहे.
 
🏏भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या मूळ संघात टेलरची निवड झाली होती; मात्र निवृत्तीची त्याने अधिकृतरित्या कल्पना दिल्यानंतर त्याला या संघातून वगळण्यात आले.
 
🏏एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील कारकिर्द वाढविण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
 
🏏वेस्ट इंडीजच्या कसोटी संघामध्ये टेलरची जागा पक्की नव्हती. गेल्या 13 वर्षांत तो 46 कसोटी सामने खेळला आहे, त्यात त्याने 130 बळी मिळविले.

🔵 *युरो 2016 चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू अँटोनी ग्रिझमन* :

⚽यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो 2016 चा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले.
 
⚽पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा बहुमान देण्यात आला.
 
⚽25 वर्षीय ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले, तर 2 गोलमध्ये सहायकाची भूमिका पार पाडली.
 
⚽फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यात तो अपयशी ठरला असला, तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याने मोठा वाटा उचलला.  
 
⚽ग्रिझमन हा 1984 नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत 6 गोल केले आहेत.

🔵 *भारत रस्ते सुरक्षेसाठी अमेरिकेचे सहकार्य घेणार* :

🔶भारतातील वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
🔶रस्ते सुरक्षेसाठी अमेरिका भारताला सहकार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
 
🔶गडकरी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी (दि.13) भारतीय पत्रकारांशी संवाद साधला.
 
🔶भारतातील वाढते अपघात आणि मृत्युमुखी पडणारे लाखो लोक याविषयी माहिती देतानाच वाढते अपघात रोखण्यासाठी अमेरिकेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
🔶भारतीय वाहतुकीच्या अत्याधुनिकीकरणासाठी सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.
 
🔶तसेच अमेरिकेतील सध्याचे वाहतूक नियम, कोडीफिकेशनची अंमलबजावणी भारतात करणार आहे.

Vinupawar.blogspot.com

No comments:

Post a Comment