Friday, 1 July 2016

दिनविशेष

🌷 *॥ दिनविशेष ॥* 🌷        
        ●●●●●●●●●●●
            🌻  *१ जूलै २०१६*  🌻
     【या वर्षातील १८३ वा दिवस 】
_*१ जुलै*_ :: *राष्ट्रीय डॉक्टर दिन*
                      *महाराष्ट्र कृषी दिन*
_*====s=====v=======m====*_
💠 *१६९३* -  संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
💠 *१८३७* - जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
💠 *१८८१* - कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.
💠 *१८८२* - डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१) यांचा जन्मदिन. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य.
💠 *१८८७* - कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्मदिन.
💠 *१९०९* - क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.
💠 *१९१३* -  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन.
💠 *१९१९* - कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
💠 *१९३४* - मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश.
💠 *१९३८* - पंडित हरिप्रसाद चौरसिया  बासरीवादक, पद्मविभूषण यांचा जन्मदिन.
💠 *१९४१* - सर सी. वाय. चिंतामणी यांचा मृत्यू. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री.
💠 *१९४८* - बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना झाली.
💠 *१९४८* - ’कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ’स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्घाटन झाले.
💠 *१९४९* - त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
💠 *१९४९* -  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा जन्मदिन.
💠 *१९५५* - ’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
💠 *१९६१* - महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.
💠 *१९६१* -  भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्मदिन.
💠 *१९६२* - डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१) यांचा मृत्यू. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य.
💠 *१९६२* -  स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१)पुरुषोत्तम दास टंडन यांचा मृत्यू. राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष .
💠 *१९६४* - न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
💠 *१९६६* - उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्मदिन.
💠 *१९६९* -  कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचा मृत्यू.
💠 *१९८९* -  कवी व शिक्षणतज्ञ  प्राचार्य ग. ह. पाटील यांचा मृत्यूदिन. ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.
💠 *१९९१* - सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
💠 *१९९४* - दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक राजाभाऊ नातू यांचा मृत्यूदीन.
💠 *१९९७* - शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
💠 *२००१* - फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
=================
         ✍✍✍ *सुविचार* ✍✍✍
         *---------------------------------*
_*प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते*.   :: _*महात्मा गांधी*_
            ❄❄❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment