Saturday, 9 July 2016

⏰ चालू घडामोडी ⏰

⏰ चालू घडामोडी ⏰

💠९ जुलै  २०१६ 💠

🎯🎯भारत-आफ्रिका संरक्षण उत्पादनात सहकार्य :

संरक्षणसामग्री, उत्पादन, खाणकाम व खनिज क्षेत्रातील संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतिशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शविली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी (दि. 8) दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट घेतली.
 
संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण असून, प्रादेशिक व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील, यावर मोदी यांनी चर्चेत भर दिला.
 
जागतिक पातळीवर संरक्षणसामग्री उत्पादनात दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे. या बैठकीदरम्यान मोदी यांनी अणुपुरवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व भारताला मिळावे यासाठी दक्षिण आफ्रिका देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले.
 
व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये दोन्ही देशांना खूप वाव असून, विशेषतः खनिजे व खाणकाम, रसायने, औषधे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल, असे मोदी यांनी या वेळी नमूद केले.
 
दहशतवादाशी लढण्याच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, ‘समाजाच्या पायावर दहशतवादी हल्ला करीत आहेत.
 
तसेच दोन्ही देश दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी कृतिशील सहकार्य करणार आहेत.
-----------------------
🎯🎯पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबाद :

पर्यटनाला अधिकाधिक चालना मिळण्यासाठी नवनवीन संधी शोधण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशातली पहिली पर्यटन परिषद राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तसेच याविषयी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग म्हणाल्या, ‘अजिंठा-वेरूळ’च्या लेण्यांकडे पर्यटकांचा नेहमीच मोठा ओघ राहिला आहे.
 
राज्यात येणाऱ्या देशी, तसेच परदेशी पर्यटकांना या स्थळांनी नेहमीच आकर्षित केले आहे.
 
ऐतिहासिक रेशीम मार्ग आणि चीनसह जगभरातल्या बुद्धिस्ट वर्तुळाशी असलेला संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 
पद्मपाणिची (बुद्ध) भलीमोठी शिल्पे असल्याने अजिंठाचा समावेश नेहमीच जगातल्या अप्रतिम पर्यटन स्थळांमध्ये होतो.
-----------------------
🎯🎯सावरकरांच्या 'त्या' ऐतिहासिक उडीला 106 वर्ष पूर्ण :

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला (दि. 8) 106 वर्ष पूर्ण झाली.
 
आठ जुलै 1910 रोजी सावरकरांनी 'मार्सेलिस' बंदरात थांबलेल्या 'मोरिया' बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला होता.
 
1909 साली मॉरली-मिनटो सुधारणां विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र उठाव केला होता.
 
तसेच या प्रकरणी ब्रिटीशांनी सावरकरांवर गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. या प्रकरणी त्यांना लंडनमध्ये अटक झाली.
 
इंग्रजांनी त्यांना मार्चमहिन्यात अटक केली. एक जुलै 1910 रोजी सावरकरांना मोरिया बोटीतून भारतात पाठवण्यात आले.
 
त्यावेळी इंग्रजांच्या तावडीतून कसे निसटायचे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता.
 
आपल्याला बोटीतून पाठवण्यात येईल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला त्यांना ज्या सागरी मार्गाने नेण्यात येणार त्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते.
 
अखेर आठ जुलैला सावरकरांना ती संधी मिळाली. त्यांनी बोटीच्या शौचकूपाच्या खिडकीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला.
 
अथांग सागर पोहून त्यांनी किनारा गाठला पण किना-यावर फ्रान्स पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक केली.
-----------------------
🎯🎯हार्दिक पटेलसह 22 जणांना जामीन मंजूर :

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलसह 22 जणांना गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी सहा महिन्यांसाठी राज्याबाहेर राहण्यास सांगितले आहे.
 
गुजरात सरकारने हार्दिकवर राजद्रोहाचा आरोप ठेवत तुरुंगात टाकले होते.
 
हार्दिक पटेलने आपल्याला जामीन मिळावा, अशी विनंती गुजरात उच्च न्यायालयाला केली होती. ती मागणी मान्य केली असली, तरी तो तुरुंगातून बाहेर पडणार किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
कारण त्याच्यावरील अन्य काही खटले अद्याप प्रलंबित आहेत.
 
राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध पाटीदार समाजाचे आंदोलन उभारल्याप्रकरणी हार्दिक पटेल याला सुरत तुरुंगात टाकले होते.
 
पाटीदार समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि महाविद्यालयांत आरक्षण ठेवावे, अशी मागणी करीत हार्दिक पटेलने अनेक सार्वजनिक सभा घेतल्या होत्या आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
-----------------------
🎯🎯ग्रेट ब्रिटनचा अँडी मरे विम्बल्डन स्पर्धेच्या फायनलमध्ये :

विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा 6-3, 6-3, 6-3 असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
 
अँडी मरे याने हा सामना 1 तास 57 मिनिटांत जिंकला.
 
आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी सामना होईल.
-----------------------
🎯🎯दिनविशेष :

1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
 
1969 : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
 
2011 : सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
-----------------------
🎯🎯पंतप्रधान-उज्वाला योजना :

सुभारंभ - 1 मे 2016, स्थळ - बालिया (उत्तरप्रदेश)

उद्देश : गरीबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासंदर्भात, या योजनेत एका गॅस जोडणीचा 1600 रुपये इतका प्रशासकीय खर्च केंद्र सरकार करणार आहे, या योजनेसाठी 8 हजार कोटींची तरतुद करण्यात आली. ज्यांना गॅसवरील अंशदानाची तितकीशी गरज नाही, अशा एक कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी, उच्चवर्गीयांनी ते सोडून दिल्यामुळे, त्यातून झालेली 2 हजार कोटींची राष्ट्रीय बचत हे योजनेचे वैशिष्ट्य आहे.
पाच कोटी गृहीणींच्या नावाने स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी करण्यात येणार आहे.
2 ऑक्टो. 2019 महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती पर्यंत गॅस जोडणी योजना पुर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
-----------------------
💦पोलिओ लस -

25 एप्रिल 2016 पासून जगात टीओपीव्ही ऐवजी बिओपीव्ही लस, देण्यास सुरुवात झाली. याला भारताने नॅशनल स्विच डे म्हटले. टीओपीव्ही म्हणजे ट्रायव्हॅलट ओरल पोलिओ व्हॅक्सिन यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूचा (ब्रुनहिल्ड, लॉन्सिंग, लिऑन) समावेश आहे. आता टाईप 2 विषाणूंचे जगातून 1999 मध्ये कायमचे उच्चाटन झालयं यासाठीच बीओपीव्ही मध्ये टाईप 2 (लॉन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला बायव्हंटलट पोलिओ व्हॅक्सिन म्हणतात. टीओपीव्ही 9 मे 2016 पासून पूर्णबंद झाली आहे.
भारत सरकारने इम्युनाइज इंडिया मोहीम सुर केली असून या मोहिमेव्दारे मातांच्या मोबाईलवर आठवणीसाठी तीन वेळा लसीकरणाच्या तारखा पाठविल्या जाणार आहे.
सध्या जगातील 80 टक्के नागरिक पोलिओ-विरहित देशांमध्ये राहतात. यास अपवाद पाकिस्तान व अफगणिस्तान (अधिक पोलिओग्रस्त रुग्ण आहेत.)
13 जाने. 2011 नंतर भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही.
27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले.
1951 मध्ये जोनास सॉलक यांनी पोलिओचे विषाणू शोधून लस तयार केली.
ब्रुनहिलडे विषाणूंमुळे अर्धांगवायू होतो, लॉन्सिंग आणि लिऑन विषाणूमुळे अपंगत्व येते.
-----------------------
🎯🎯स्टँडअप इंडिया योजना -

योजनेचा शुभारंभ - 5 एप्रिल 2016 नोएडा
उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
योजनेचा उद्देश - देशातील अनुसूचित जाती - जमातीतील आणि महिला उद्योजक यांना पतपुरवठा करणे.
काय आहे योजना - स्टँडअप योजने अंतर्गत 10 लाख रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत कर्ज अनुसूचित जाती जमाती व महिला या गटातील उद्योजकांना दिला जाणार आहे.
आयडीआयबी बँकेने ही योजना सुर केली. (20 एप्रिल 2016)
-----------------------
🎯🎯Spices बोर्ड भरती 2016

पद संख्या : 30 जागा
 पद
 1. क्षेत्रीय अधिकारी :
शिक्षण : ग्रॅजुएशन कृषी / फळबाग सोबत 6 OGPA किंवा M.Sc आणि गुण वनस्पतिशास्त्र व उत्तम ज्ञान कम्प्युटर मध्ये.
वेतनमान : Rs.9300-34800/- with GP Rs.4200/-pm
 2. कनिष्ठ केमिस्ट :
शिक्षण : ग्रॅजुएशन रसायनशास्त्र मध्ये आणि नियंत्रण लॅब विश्लेषणात्मक प्रक्रिया काम 01 वर्षाचा अनुभव.  
वेतनमान : Rs.5200-20200/- with GP Rs.1900/-pm
 3. विस्तार सहाय्यक :
शिक्षण : ग्रॅजुएशन बॉटनी / शेती / बागायती मध्ये सोबत 6 OGPA व उत्तम ज्ञान कम्प्युटर मध्ये.
वेतनमान : Rs.5200-20200/- with GP Rs.2000/-pm
 परीक्षा शुल्क : Rs.400/-
 अर्ज करण्याची पद्धत :
1. ऑनलाइन करावा.
2. पोस्टाने करावा.
 पत्ता :
To,
The Secretary, Spices Board,
Sugandha Bhavan, N.H By – Pass Road,
Palarivattom P.O.,
Kochi – 682025, Kerala
 अनधिकृत संकेतस्थळे : www.indianspices.com
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2016
-----------------------

🎯🎯SBI उपाध्यक्ष भरती 2016

पद संख्या : 04 जागा
 पद
 1. उपाध्यक्ष (सी आर एम अंमलबजावणी) : 01 जागा
शिक्षण : MBA आणि MCA आणि 10 वर्षाचा अनुभव.
 2. उपाध्यक्ष (Customer Analytic) : 01 जागा
शिक्षण : पोस्ट ग्रॅजुएशन स्टॅटिस्टिक्स मध्ये आणि गणित, MBA मार्केटिंग मध्ये आणि 10 वर्षाचा अनुभव.  
 3. उपाध्यक्ष (Technology Architect) : 02 जागा
शिक्षण : B.E, B.Tech आणि M.Sc, M.Tech IT मध्ये आणि CS / इलेक्ट्रॉनिक्स / MCA 10 वर्षाच्या अनुभव.
 वेतनमान : Rs.24 Lacs
 वय : 45 वर्ष
 परीक्षा शुल्क : Rs.600/-
 अर्ज करण्याची पद्धत :
1. ऑनलाइन करावा.
2. पोस्टाने करावा.
 पत्ता :
To,
The Central Recruitment & Promotion Department,
Corporate Centre, 03rd Floor, Atlanta Building,
Nariman Point, Mumbai – 400021
 अनधिकृत संकेतस्थळे : www.sbi.co.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2016
-

No comments:

Post a Comment