Thursday, 30 June 2016

चालू घडामोडी (1 जुलै  2016)*

*चालू घडामोडी (1 जुलै  2016)*

📛 *सौरऊर्जा प्रकल्पांना जागतिक बॅंकेचे पाठबळ* :

✴सौरऊर्जेच्या वापरासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत जागतिक बॅंकेने (दि.30 जून) या क्षेत्राच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.

✴ तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली 121 देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही (आयएसए) बॅंकेने करार करत जागतिक स्तरावर सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.
 
✴यानुसार, 2030 पर्यंत सौर क्षेत्रात एक हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
 
✴जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम हे भारतात आले असून, त्यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाली.
 
✴तसेच या करारामुळे जागतिक बॅंक ही 'आयएसए'ची आर्थिक भागीदार बनली आहे.
 
✴सौरऊर्जेचा वापर वाढविणे, हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असून, त्याला पाठबळ म्हणून सौरनिर्मिती प्रकल्पांमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचेही जागतिक बॅंकेने या वेळी जाहीर केले.

📛 *भारतवंशीय राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर* :

✳भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल (वय 39) लंडनचे उपमहापौर झाले आहेत.
 
✳तसेच सादिक खान हे तेथील महापौर आहेत.
 
✳लंडन शहराचा बुद्धिमत्तेकडे आणि साहसी उपक्रमांकडे बघण्याचा खुलेपणा सार्वमतामुळे बदलून जायला नको, असे अग्रवाल म्हणाले.
 
✳भारतात सामान्य वातावरणात वाढलेले राजेश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या रॅशनलएफएक्स या विदेशी चलन व्यवहारांतील प्रचंड मोठ्या कंपनीची गेल्या वर्षीची वार्षिक उलाढाल 1.3 अब्ज पौंडांची होती.

📛 *ज्येष्ठ लेखक रा.चिं. ढेरे यांचे निधन* :

🔷मराठीतील ज्येष्ठ लेखक, संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे (दि.1) त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
 
🔷ढेरे यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयात विशेष अभ्यास होता. त्यांनी या विषयावर विपुल लेखनही केले आहे.
 
🔷साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांनी स्वत:कडील पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला.
 
🔷तसेच त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङमय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे.
 
🔷मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी हा संग्रह उपयुक्त असा आहे.
 
☸रा.चिं. ढरे यांना मिळालेले पुरस्कार - 
 साहित्य अकादमी पुरस्कार1987 - 'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय'महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं.ना. जोगळेकरपुरस्कार(2013)
 त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (14 मार्च 2010)
 पुणे महानगरपालिकेचामहर्षीवाल्मीकीपुरस्कार (2013)
 अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (29-3-2015)

📛 *काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती* :

☸अनंतनाग मतदारसंघातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी (दि.30 जून) सदस्यत्वाची शपथ घेतली.
 
☸तसेच येथील राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
 
☸अनंतनाग जिल्ह्यातून विधानसभेवर जाण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे.

📛 *नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक 8 ची यशस्वी चाचणी* :

🔶जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक 8 ची चाचणी घेण्यात आली आहे.

🔶 (दि. 30 जून) सकाळी ओडिशाच्या किनारपट्‌टीवरील संरक्षण तळावरून ही चाचणी घेण्यात आली.
 
🔶सुरक्षेसाठी चाचणीच्या आधी ओडिशाच्या चंडीपूर रेंजजवळील 7 गावांमधील 3600 लोकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
 
🔶नव्याने विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम)आज ओडिशातील तटरक्षक तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 
🔶बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक - ची क्षमता किलो मीटरपर्यंत मारा करण्याची आहे.

🔶याची लांबी चार मीटर असून यावर किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते.
 
🔶तसेच या क्षेपणास्त्रात 'मल्टिफंक्‍शनल सर्व्हेलिअंस' ही प्रणाली असून हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही. याची अंतिम चाचणी भारताचे सुरक्षा अधिकारी, डीआरडीओ आणि इस्त्राईलच्या उद्योजकांसोबत घेण्यात आली.

   🌅 *दिनविशेष*🌅 :

💢 *महाराष्ट्र कृषी दिन*.

💢 *घाना प्रजासत्ताक दिन*.
 
💢 *1913 : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म*.
 
💢 *1955 : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली*.
 
💢 *1961 : कल्पना चावला, अंतराळवीर यांचा जन्म*.
 
💢 *1961 : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना*.
 
💢 *2006 : चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन*.
Vinupawar.blogspot.com

Job update

जॉब अपडेट
Vinupawar.blogspot.com
🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃
🎯🎯भारतीय रेल्वे विभाग :

विभाग -केंद्र ,स्थापना

@मध्य विभाग -मुंबई, सन 1951
@पश्चिम विभाग -मुंबई, सन 1951
@उत्तर विभाग- दिल्ली, सन 1952
@दक्षिण विभाग -चेन्नई, सन 1951
@पूर्व विभाग- कलकत्ता, सन 1955
@दक्षिण पूर्व विभाग- कलकत्ता, सन 1955
@दक्षिण-मध्य विभाग - सिकंदराबाद, सन 1966
@उत्तर पूर्व विभाग- गोरखपूर ,सन 1952
@सरहद्द रेल्वे विभाग-गोहाटी ,सन 1958
  @पूर्व किनारपट्टीय विभाग -भुवनेश्वर,सन 1996
@उत्तर मध्य विभाग- अलाहाबाद ,सन 1996
@पूर्व मध्य विभाग- हाजीपूर, सन 1996
@उत्तर पश्चिम विभाग- जयपूर,सन 1996
@पश्चिम मध्य विभाग- जबलपूर, सन 1996
@दक्षिण पश्चिम विभाग- बंगलोर ,सन 1996
@दक्षिण-पूर्व-मध्य विभाग -बिलासपुर,सन 1998 
@कलकत्ता मेट्रो- कलकत्ता, सन 2010
-----------------------

🎯🎯अकोला नगरपरिषद प्रशासक भरती 2016

पद संख्या : 45 जागा  
 पद :
 1. पर्यवेक्षक (सिविल) : 06 जागा  
शिक्षण : डिप्लोमा / B.E. सिविल मध्ये.
 2. पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) : 03 जागा  
शिक्षण : डिप्लोमा / B.E. इलेक्ट्रिकल मध्ये.
 3. पर्यवेक्षक (कम्प्युटर) : 03 जागा  
शिक्षण : डिप्लोमा / B.E. कम्प्युटर मध्ये.
 4. पर्यवेक्षक (पाणी पुरवठा, नाले आणि स्वच्छता) : 05 जागा  
शिक्षण : डिप्लोमा / B.E. मेकॅनिकल / पर्यावरण & पोस्ट ग्रॅजुएशन पर्यावरण विज्ञान आणि MSCIT.
वेतनमान : Rs.9300-34800/- with GP of Rs.4200/-pm
 5. सहाय्यक लेखापाल / लेखा परीक्षक : 04 जागा  
शिक्षण : ग्रॅजुएशन वाणिज्य मध्ये आणि ICWA / CA, MSCIT.
वेतनमान : Rs.9300-34800/- with GP of Rs.4200/-pm
 6. कर आकारणी आणि प्रशासकीय सेवा (C-2) : 13 जागा  
शिक्षण : ग्रॅजुएशन, पोस्ट ग्रॅजुएशन सामाजिक कार्य, सार्वजनिक प्रशासन, नगर आणि देश नियोजन, राज्यशास्त्र, कायदा, वाणिज्य, एमबीए, कोणतीही अभियांत्रिकी MS-CIT.
वेतनमान : Rs.5200-20200/- with GP of Rs.2800/-pm
 7. कर आकारणी आणि प्रशासकीय सेवा (C-2) : 11 जागा  
शिक्षण : ग्रॅजुएशन उप अधिकारी कोर्स राष्ट्रीय नागपूर अग्निशमन सेवा कॉलेज अनिवार्य झाले & MS-CIT.
वेतनमान : Rs.5200-20200/- with GP of Rs.2800/-pm
 वय : 18-43 वर्ष.
 परीक्षा शुल्क :
खुला वर्ग - Rs.300/-  
मागासवर्ग - Rs.150/-  
 अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाइन करावा.
 लेखी परीक्षेची तारीख : 17 जुलै 2016
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2016

🎯🎯महाराष्ट्र लोक सेवा आयोग पोलीस सब इन्स्पेक्टर लि विभाग परीक्षा 2016

पद संख्या : 828 जागा
 पद :
 1. पोलीस सब इन्स्पेक्टर
 शिक्षण :
1. कोणत्याही क्षेत्रात ग्रॅजुएशन आणि 4 वर्ष सेवा
Vinupawar.blogspot.com

*चालू घडामोडी (30 जून 2016)*

🌞 *चालू घडामोडी (30 जून 2016)*🌞
VInupawar.blogspot.com
🔴 *केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे नाइटलाइफला मंजूरी* :

✳दुकाने, मॉल तसेच चित्रपटगृहे आता बाराही महिने चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबतच्या सुधारित कायद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.29) मंजुरी दिली.
 
✳तसेच या निणर्यानुसार उत्पादन प्रकल्प वगळता आता जेथे दहा किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत, अशी दुकाने किंवा मॉलना वर्षभर ती कधीही सुरू व बंद करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
 
✳या ठिकाणी महिला कमर्चाऱ्यांनाही रात्रपाळीत काम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
 
✳मात्र त्यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे बंधन आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, कॅंटीन, प्राथमिक उपचार सुविधा, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.

✳ 'मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयक 2016'ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

🔴 *देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य* :

☢औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे.

☢ 2014-15 या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यातंर्गत उत्पन्नाने नऊ लाख 50 हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे या अहवालात नमूद केले असून, 2013-14 च्या तुलनेत ही वाढ 5.7 टक्के अधिक आहे.
 
☢भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाच्या माध्यमातून विविध राज्यांतील प्रगतीची आणि तेथील आर्थिकबाबींची रंजक माहिती पुढे आली आहे.
 
☢तसेच यानुसार, देशातील अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वच राज्यांपेक्षा पुढे राहिल्याचे दिसून आले आहे.
 
☢राज्यांतर्गत उत्पादनाच्या वाढीमध्ये तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाच लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

☢विशेष म्हणजे, तामिळनाडू राज्य श्रीमंतीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील फारकत स्पष्ट करणाऱ्या राज्याच्या वित्तीय तुटीचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे.

🔴 *संसदचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून* :

🔯संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
 
🔯तसेच या अधिवेशनात वस्तू आणि सेवा विधेयक (जीएसटी) विधेयक मंजुरीला सरकारचे सर्वोच्च प्रधान्य आहे.
 
🔯मात्र, सर्वसहमतीने विधेयक संमत व्हावे, अशी इच्छा असून सर्व राज्यांनी 'जीएसटी'साठी दिलेला पाठिंबाही विरोधकांनी लक्षात घ्यावा, असे सरकारने विरोधी पक्षांना विशेषतः कॉंग्रेसला बजावले आहे.

🔯 'एनएसजी', पंतप्रधानांचे परदेश दौरे यावर सरकारने स्वतःहून निवेदन सादर करण्याचीही तयारी दर्शविली आहे.
 
🔯संसद अधिवेशन बोलावण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषयक समितीची (सीसीपीए) (दि.29) बैठक होऊन त्यात पावसाळी 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन बोलावण्याची राष्ट्रपतींना शिफारस करण्याचे ठरले.

🔴 *राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत स्वातीला रौप्य* :

🏵महाराष्ट्राची स्वाती गाढवेने 56 व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले.
 
🏵तसेच दुसरीकडे याच प्रकारात संजीवनी जाधवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
🏵श्रद्धा घुलेने लांब उडीत कांस्यपदक जिंकले. दिल्लीच्या बी. सौम्या हिने 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत (दि.29) सुवर्णपदक जिंकले.

🏵 सौम्या हिने कारकिर्दीतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना 1 तास 42 मि. 55.24 सेकंद वेळ नोंदविताना शानदार सुवर्णपदक जिंकले.

🔴 *महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी* :

☸महाराष्ट्रातील औरंगाबाद ते तेलवाडीदरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
 
☸अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली.
 
☸केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने (सीसीईए) पंजाब, ओडिशा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या तीन प्रस्तावांना मंजुरी दिली.
 
☸तसेच यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद-तेलवाडी दरम्यानच्या (महामार्ग क्रमांक 211) 87 किलोमीटर पट्ट्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे.
 
☸या नंतर पंजाबमधील फगवाडा-रूपनगरदरम्यान 80.82 किलोमीटर महामार्गाचे आणि ओडिशामध्ये अंगुल-संबलपूरदरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाईल.

🔴 *खनिज शोधासाठी नवे राष्ट्रीय उत्खनन धोरण* :

✴भूगर्भात असलेल्या विविध प्रकारच्या खनिजसाठ्यांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उत्खनन करण्यासंबंधीच्या नव्या ‘नॅशनल मिनरल एक्प्लोरेशन पॉलिसी’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.29) मंजुरी दिली.
 
✴तसेच यामुळे जेथे मोठे खनिजसाठे मिळू शकतात अशा सुमारे 100 संभाव्य खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा होईल.
 
✴या धोरणानुसार भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था, मिनरल एक्प्लोरेशन कॉर्पोरेशन यासारख्या सरकारी कंपन्यांखेरीज खासगी उद्योगांनाही या क्षेत्रात प्रवेश देऊन देशातील खाण उद्योगाला चालना देण्याची सरकारची योजना आहे.
 
✴जेथे खनिजे मिळू शकतात असे देशातील जेवढे क्षेत्र भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने अंदाजित केले आहे त्यापैकी जेमतेम 10 टक्के क्षेत्रात खनिजांचा शोध घेतला गेला आहे व त्यापैकी जेमतेम दीड-दोन टक्के क्षेत्रात सध्या खाणकाम सुरु आहे.
VInupawar.blogspot.com

        🌅 *दिनविशेष* 🌅

💢 *1758 : डॉमस्टाटलची लढाई*.
 
💢 *1805 : मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता*.
 
*1905 : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला*.
 
💢 *1936 : गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित*.
VInupawar.blogspot.com
🔴🔴🔴🔴🔴🔵🔴🔴🔴🔴🔴

English important words


Important words of Antonyms : 50 Words

1. Inevitable- Avoidable
2. Exceptional- Common
3. Permanent- Temporary
4. Dim- Luminous
5. Reckless- Careful6. Explicit- Ambiguous
7. Incredible- Believable
8. Repel- Attract
9. Rapidly- Slowly
10. Meticulous- Careless
11. Barbarous- Civilized
12. Successor- Predecessor
13. Urban- Rural
14. Conclusive- Indecisive
15. Terminate-Begin
16. Niggardly- Lavishly
17. Advanced- Receded
18. Enlightened- Ignorant
19. Moderate- Extreme
20. Superficial- Thorough
21. Scorn- Admiration
22. Trivial- Serious
23. Loquacious- Reserved
24. Confiscate- Release
25. Often- Rarely
26. Eminent- Notorious
27. Embark upon- Conclude
28. Diffidence- Boldness
29. Paucity- Plenty
30. Triggered- Choked
31. Fastidious- Adjustable
32. Grandiose- Simple
33. Bleak- Bright
34. Insolent- Humble
35. Lurid- Mild
36. Unscrupulous- Conscientious
37. Melodious- Tuneless
38. Contaminate- Purify
39. Frugal- Extravagant
40. Falling off- Improvement
41. Genial- Unkind
42. Shallow- Deep
43. Immune- Vulnerable
44. Veneration- Disrespect
45. Yield to- Resist
46. Concur- Disagree
47. Vague- Precise
48. Humility- Pride
49. Extol- Censure
50. Takes off- Lands
___________________________________

वाचता वाचता


वाचता वाचता:-
-----------------------------------------------------------------------

• सर्वांसाठी घरे‘ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती देण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत गृह प्रकल्पांना विकास, मोजणी, मुद्रांक, तसेच नोंदणी शुल्कात सवलती, तसेच गृह प्रकल्पांना नाममात्र दरात जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेल्या मंत्री परिषदेत घेण्यात आला.

राज्यातील उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत 2011-12 दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट 65 वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला

भारतीय प्रशासकीय सेवेतील "आयएएस "आयपीएस‘ अधिकाऱ्यांना आता परदेशातील नियुक्तीवर सलग सात वर्षे सेवा करता येणार आहे. सध्या हा कालावधी पाच वर्षांचा आहे

• चीनमध्ये बनविण्यात आलेल्या पहिल्या जेट विमानाने चेंगडू ते शांघाय असे व्यावसायिक उड्डाण करत आपली पहिलीवहिली हवाई सफर यशस्वीपणे पूर्ण केली. "21 व्या शतकातील एशियन रिजनल जेटम्हणून या विमानाचे नाव "एआरजे21-700‘ असे ठेवण्यात आले आहे. एआरजे21 या प्रकल्पाची सुरवात 2002 मध्ये करण्यात आली होती, यातील पहिले विमान 2007 पर्यंत तयार होणे अपेक्षित होते;

• मंत्री, मंत्रालये आणि प्रकल्प किंवा योजना मूल्यमापन-मंजुरी समित्यांच्या योजनाबाह्य खर्चविषयक आर्थिक मर्यादांमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला
.
• वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या तकाटा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिगेहिसा तकादा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला

• तृतीयपंथीयांचा विवाह इस्लाम कायद्याने वैध असल्याचा फतवा पाकिस्तानातील पंजाबची राजधानी लाहोरजवळील 50पेक्षा अधिक मुस्लिम धर्मगुरूंनी काढला

* देशातील 145 गावांचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

• 'तेजस' या स्वदेशी बनावटीच्या हलक्याा लढाऊ विमानांचे पहिले स्क्वाड्रन ता. 1जुलै २०१६ पासून भारतीय हवाईदलात दाखल होत आहे.  प्रत्यक्ष सीमेवर ते पुढील वर्षी तैनात करण्यात येणार आहे. "तेजस‘ हे विमान पाकिस्तानच्या "जेएफ 17‘ या लढाऊ विमानांपेक्षा सरस आहे.

* देशातील काळा पैसाधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ""30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती जाहीर करा अन्यथा नंतर त्रास सहन करा,'' असा निर्वाणीचा इशारा दिला

• अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. अमेरिकेने भारताला "महत्त्वाचा संरक्षण सहकारी‘ म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार आहे.

* प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्त्री जन्माचे प्रमाण घटत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील आणखी सहा जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनपुरस्कृत बेटी बचाओ-बेटी बढाओ अभियान राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये सोलापूर, हिंगोली, पुणे, परभणी, नाशिक व लातूरचा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
• जिल्हा हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण
हिंगोली 882
सोलापूर 883
पुणे 883
परभणी 884
नाशिक 890
लातूर 889

Wednesday, 29 June 2016

आंतरराष्ट्रीय संस्था

🔴🔵⚫⚪⚫⚪⚫⚪⚫🔵🔴
🔷🔶💠आंतरराष्ट्रीय संस्था💠🔶🔷
⬇⬇⬇⬇ⓂⓂⓂⓂ⬇⬇⬇

🔴1. जागतिक अन्न कृषी संघटना (IFO) :

जागतिक अन्न कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.
 या संघटनेची स्थापना सन 1945 मध्ये करण्यात आली आणि
या संस्थेचे
🔹कार्यालय : रोम (ग्रीक)
येथे आहे.

🔴2. जागतिक अणुशक्ती अभिकरण (IAA) :

जागतिक अणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि शांततापूर्ण कार्यक्रमाकरिता अणुशक्ती कार्यक्रम राबविणे.
 या उद्देशाने संस्थेची सन 1957 मध्ये स्थापना करण्यात आली.
 या संस्थेचे
🔹कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
येथे आहे.

🔴3. आंतरराष्ट्रीय विकास संघटना :

जागतिक विकासाचा कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही सन 1960 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली.
 या संस्थेचे
🔹कार्यालय : वॉशिंग्टन (अमेरिका)
येथे आहे.

🔴4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) :

जागतिक कामगाराचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने सन 1919 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
या संघटनेचे
🔹कार्यालय : जिनिव्हा (स्वत्झर्लंड)
येथे आहे.

🔴5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) :

आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
 ही संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांकडून मिळणार्‍या वर्गणीतून आपले भांडवल उभे करते आणि सभासद राष्ट्रांना अडचणीच्या वेळी अल्प मुदतीचे कर्ज देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल साधण्यास मदत करते.
 या संस्थेचे
🔹कार्यालय :वॉशिंग्टन (अमेरिका)
येथे आहे.

🔴6.संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय अनई सांस्कृतिक संघटना (UNESCO) :

जागतिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : पॅरिस (फ्रान्स)
येथे आहे.

🔴7. जागतिक आरोग्य संघटना (WHO) :

जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
येथे आहे.

🔴8. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकासाठीचा अनुशासन निधी (UNICEF) :

बालकांच्या सर्वागिण विकासाकरिता जागतिक स्तरावर कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : न्यूयॉर्क (अमेरिका)
येथे आहे.

🔴9. संयुक्त राष्ट्र औधोगिक विकास संघटना (UNIDO) :

विकसनशील राष्ट्रांना औधोगिककरणास मदत करणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या औधोगिक प्रोत्साहन कार्यक्रमाचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने सन 1967 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
आहे.

🔴10. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) :

जागतिक लोकसंख्या नियंत्रणाबाबत कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संघटना सन 1967 स्थापन करण्यात आली.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : न्यूयॉर्क (अमेरिका)
येथे आहे.

🔴11.जागतिक व्यापर संघटना (WTO) :

जागतिक व्यापारात सुसूत्रीकरण आणण्याच्या उद्देशाने सन 1995 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
 या संघटनेचे
🔹कार्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
येथे आहे.

🔴12.जागतिक बँक (WORLD BANK) :

सन 1944 साली ब्रिटनवूड परिषदेतील निर्णयानुसार ही बँक सन 1945 मध्ये स्थापन करण्यात आली.
 जागतिक बँकेच्या सभासद राष्ट्रांना पुनर्रचना विकासाच्या कार्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देणे हा या बँक स्थापनेमागील महत्वाचा उद्देश आहे.
 या बँकेचे
🔹मुख्यालय : वॉशिंग्टन (अमेरिका)
येथे आहे.  

🔴13. इंटरपोल (INTERPOL) :

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्धच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलीस दलात परस्परांना सहकार्य समन्वय साधण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
 🔹स्थापना : सन 1923
 🔹मुख्यालय : लेपान्स (लियोना)

🔴14.रेडक्रॉस (REDCROSS) :

युद्ध भूकंप, वादळ आणि आपत्कालीन स्थितीमध्ये शांतता प्रस्तापित करणे आणि आपदग्रस्तांना मदत पोहचविण्याच्या उद्देशाने हेन्री ज्यूनाट यांनी ही संघटना स्थापन केली आहे.
 🔹स्थापना : 1983
 🔹मुख्यालय : जिनिव्हा.
भारतात या संस्थेचे अध्यक्ष भारताचे तात्कालिन राष्ट्रपती असतात.

🔴15. जागतिक मानवी हक्क संस्था (अॅम्नेस्टी इंटरनॅशनल) :

ब्रिटिश वकील बिटर बेरेन्स यांनी पुढाकार घेवून मूलभूत मानवी हक्क अबाधित राहण्यासाठी झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. या संघटनेचे 160 हून अधिक देश सभासद आहेत. मानवी हक्क प्रस्थापित करण्याकरीता ही संस्था कार्य करते.
 🔹स्थापना : 18 मे 1961
 🔹मुख्यालय : लंडन