MPSC History:
बाबराचा बाप उमर शेख मिर्झा याला परंपरागत पद्धतीने काबुल चे राज्य मिळाले होते. काही कारणाने ते
त्याच्याकडून जाऊन त्याला फरहाना (सध्याचे उझबेकिस्तान) (सिर्दार्या नदीच्या उगमाजवळचा प्रांत-
राजधानी आदिजान) प्रांत मिळाला.बाबराला बापाकडून हे राज्य मिळाले. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ आहे. हे
राज्य स्थिर राज्य नसून मुख्यतः लुटमारी हाच यांचा मुख्य धंदा होता.
एकंदरीत अंदाज यावा म्हणून एक नकाशा
बाबर बापाकडून तैमुरलंगचा वंशज ,तर आई कडून चंगीझ खानचा वंशज होता. बाबर मुघल नव्हता त्याला स्वतःला
तुर्की म्हणवून घेणे आवडत असे.
[image ref-3]
बाबरच्या बापाला १० भाऊ होते. यांपैकी समर्कद चे राज्य करणारा राज्यकर्त्याचा मृत्यु झाल्याने त्यावर
बाकी वंशजांनी हल्ले केले, यामध्ये बाबर पण होता. समर्कदचे राज्य जिंकून त्याच्यां नावाने खुद्बासुद्धा पढला
गेला पण शत्रूंनी आदीजान या राजधानीच्या शहरावर हल्ले सुरु केले. बाबराने समर्कद सोडले असता त्याच्या
चुलत भावाने (सुलतान आली)ने समर्कद घेतले आणि भाऊ जहागीर मिर्झा याने लष्करात फितुरी माजवून
आदिजान घेतले. बाबर राज्यभ्रष्ट झाला. पण परत लहान लहान टोळ्या एकत्र करून त्यांने राजधानी मिळवली.
बाबराला मुख्य वेध समर्कद शहर जिंकण्याचे लागले होते. पण त्याचा शाबयानी खानने (चंगीज खानाचा वंशज -
चंगेज खानाचे वंशज तैमुरच्या राज्या पलीकडे पूर्वेस आणि उत्तरेस राज्य करत होते) पराभव केला, याला सुद्धा
समर्कदच्या राज्य मध्ये विशेष रस होता. कारण म्हणजे अमुदर्या आणि सिर्दर्या या नद्याच्या मध्ये असलेला हा
भाग अत्यंत सुपीक होता, याला एखाद्या सुंदर बागेची उपमा देता येईल. येथील फळांचे वर्णन बऱ्याच ठिकाणी
केलेले आढळते.
तर शाबयानी खानने आक्शिच्या लढाईमध्ये बाबर आणि त्याच्या भावाचा पराभव केला. शाबयानी खानने
राज्य खूप वाढवले,ताश्कंद प्रदेश सुद्धा जिंकून घेतला. या वेळी काबुलचे राज्य बाबरच्या चुलत्याच्या हातात
होते, त्याच्या मृत्यू नंतर अल्पकाळ वजीराने राज्य केले पण त्याच्या खून करण्यात आला. या राजकीय
घडामोडींचा फायदा घेत बाबराने हे राज्य मिळवले आणि काही दिवसातच कंदाहार शहर घेतले .
बाबर काबुल वर राज्य करत असताना शाबयानी खान इराणच्या बादशाह (इस्माईल- 1) बरोबरच्या लढाई मध्ये
मारला गेला.या लढाई मध्ये matchlock या प्राथमिक स्वरूपाच्या बंदुका वापरल्या गेल्या होत्या.बाबर नवीन
शस्त्रास्त्रे आपल्या फौजेत वापरण्यास बराच उत्सुक असे. त्याने लगोलग आपल्या सैन्यात marchlocksचा समावेश
करून घेतला आणि उस्ताद आली याला त्याचे प्रशिक्षण देण्या साठी नेमले.
बाबर आणि इराणचा सत्ताधारी इस्माईल शाह
बाबराचा समर्कद चा मोह सुटला नव्हता त्याने एकाएकी हल्ला करून हे शहर ताब्यात घेतले. काबुलचे राज्य भाऊ
नसीर याच्या ताब्यात देऊन बाबराने समर्कद चे राज्य चालवण्याचा निर्णय घेतला, काही काळ पर्शियाच्या
शहा बरोबर मैत्री करून त्याने राज्य चालवले .पण समर्कद चे राज्य बाबराच्या नशिबात नव्हतेच. शिया-सुन्नी
दंगली होऊन हे राज्य परत बाबराच्या हातातून गेले याच काळात चलदिरन(chaldiran)ची लढाई होऊन त्यात
इस्माईलचा-बाबरच्या मित्रपक्षाचा पराभव झाला. बाबर आता काबुलला आला आणि राज्य विस्तार आणि
धन दौलत या दृष्टीने हिंदुस्तान हे त्याचे लक्ष्य बनले. नंतरच्या काळात तो म्हणत असे कि समर्कद मिळवण्यात
आलेले अपयश ही अल्लाह ने दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे.
पानिपतच्या निर्णायक लढाई आधी बाबराच्या हिंदुस्तान च्या दिशेने ४ मोहिमा केलेल्या होत्या.
या वेळी भारत वर लोदी घराण्याचा अंमल होता. इब्राहीम खान हा सिकंदर खानचा सर्वात लहान मुलगा
होता.लोदी घराण्यात अंतर्गत बंडाळ्या होत्या. इब्राहीमच्या मोठ्या भावाला (जलालुद्दीन)जौनपुर आणि
इब्राहीमला दिल्ली अशी प्रथम वाटणी झालेली होती. जलालुद्दीन हा इब्राहीम चा मोठा भाऊ
(रियासतकार याचा उल्लेख अल्लाउद्दीन असा करतात_मुसलमानी रियासत खंड २ प्रकरण २१)*२. इब्राहीमने
अफगाणांना सोडून स्वतःच्या विश्वासातल्या लोकांना मुख्य पदे द्यायला सुरुवात केली. त्या मुळे त्याला
असलेला अफगाणी लोकांचा पाठिंबा कमी होऊ लागला होता. त्यांनी जलालुद्दीनला आपला नेता
मानायला सुरुवात केली होती. अंतर्गत राजकारणाचा परिणाम म्हणजे इब्राहीमने सैन्याच्या जोरावर
जलालुद्दीनला मारले. आता जलालुद्दीनला पाठीबा देणाऱ्या अफगाणी लोकांचा पाठिंबा बिहारकडे राज्य
करत असलेल्या दरिया खान याला झाला.
आता पंजाबच्या सुभ्यावर दौलतखान तर दिल्लीवर इब्राहीमखान लोदी राज्य करत होते.
आलम खानने*2(इब्राहीम च्या काकाने ) बाबरला इब्राहीम खान विरुद्ध मदत मागितली*१. त्याच्याच आधी
दौलत खानने आपला मुलगा दिलवर खान याला काबुलला पाठवून बाबराला हिंदुस्तानचे आमंत्रण दिले. बाबरने
बागेत बसून हिंदुस्तानच्या मोहिमेसाठी शुभसंकेत मागण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली तो आंबे/
खरबूज/द्राक्षे इत्यादी फळाची अपेक्षा करत होता [३](वाईट भाषांतरासाठी माफ करावे)तेव
Sunday, 19 June 2016
Mpsc History
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment