🔰 भारतीय वायुदलात प्रथमच महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश झाला असून तीन महिला सैनिकांचा समावेश असलेली ही तुकडी वायुदलात
दाखल..:--
🔗 अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत, अशी त्या तीन महिला वैमानिकांची नावे असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या उपस्थितीत दुंडीगल येथील अकादमीतील पासिंग आऊट परेडनंतर त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारली..
🔗 या तिघींनीही १५० तासांच्या विमान उड्डाणाचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले असून पासिंग परेड नंतर त्यांना आणखी सहा महिन्यांसाठी प्रगत जेट प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल व त्यानंतर त्यांचा समावेश नियमित तुकडीत करण्यात येईल..
🔗 १८ जून रोजी भारतीय हवाई दलाला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळणार असल्याची घोषणा, भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल अरुप रहा यांनी महिलादिनी म्हणजेच ८ मार्च रोजी केली होती..
🔗 १८ जून रोजी वायुसेनेत महिला लढाऊ वैमानिक दिसतील,’ असे अरूप राहा यांनी सांगितले होते..
🔗 त्यानुसार पहिल्या तुकडीसाठी तीन महिलांना प्रशिक्षण देण्यात आले होते..
🔗 पासिंग परेड पुर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेण्यात आले असून त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत..
🔗 मात्र आणखी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतरच त्यांचा नियमित तुकडीत समावेश होईल..
_______________________________________
No comments:
Post a Comment