मेस्सी निवृत्त:-
----------------------------------------------------
* अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने चिलीविरूद्ध आलेल्या अपयशानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पदार्पण : विरुद्ध हंगेरी २००५
सामने : ११३
गोल : ५५
अंतिम फेरी : कोपा अमेरिका २००७, २०१५ व २०१६; विश्वचषक २०१४.
* १७ ऑगस्ट २००५ मध्ये हंगेरीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत १८ वर्षीय मेस्सीने अर्जेटिनाकडून पदार्पण केले. ६३व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मेस्सीला हंगेरीच्या बचावपटूला कोपरा मारल्यामुळे मिनिटाच्या आतच पुन्हा बोलावण्यात आले.
* १ मार्च २००६ मध्ये मेस्सीने क्रोएशियाविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली. २००८च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये मेस्सीच्या कामगिरीच्या जोरावर अर्जेटिनाने सुवर्णपदक पटकावले.
* मेस्सीने आजपर्यंतच्या कारकिर्दीत 500 पेक्षा जास्त गोल केले आहेत.
* मेस्सीला आजपर्यंत 5 वेळा सर्वोत्कृष्ट जागतिक खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला आहे
* 2012मध्ये तब्बल 91 गोल करून त्याची नोंद गिनिजबुकमध्ये झाली.
* फिफाच्या जागतिक संघात मेस्सीला आजवर 9 वेळा स्थान मिळाले आहे.
* फिफा क्लब विश्वकरंडक स्पर्धेचा दोन वेळा "गोल्डन बूट‘ पुरस्कार मिळविला. (2009,2011)
* जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये पहिल्या तिघांच्या यादीत मेस्सी आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे नऊवेळा समावेश राहिला आहे.
* अर्जेंटिनाकडून सर्वाधिक 55 गोल करण्याचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर आहे.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रव्हेनेझुएला विरूध्द झालेल्या लढतीत अर्जेंटिनाकडून सर्वाधिक 55 गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
* ग्वाटेमालाविरुद्धही तीन गोल करून मेस्सीने मॅरेडोना यांच्या आंतरराष्ट्रीय गोल विक्रमाला मागे टाकले. २०१६च्या कोपा अमेरिका स्पध्रेत पनामाविरुद्ध मेस्सीने १९ मिनिटांत हॅट्ट्रिक नोंदवली
No comments:
Post a Comment