Friday, 24 June 2016

विलिनीकरन


विलिनीकरन:-
---------------------------------------------------

एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने मॅक्स लाइफ:-
* खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने मॅक्स लाइफ या दुसऱ्या खासगी विमा कंपनीला आणि तिची प्रवर्तक असलेल्या मॅक्स फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसला विलीन करून घेण्याबाबत निर्णय
* भारतीय आयुर्विमा उद्योगातील आजवरचा हा सर्वात मोठा एकत्रीकरणाच्या व्यवहार ठरणार असून, दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित गंगाजळी ही एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल.
* या प्रस्तावित विलीनीकरणाला एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी, मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि मॅक्स फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लि. या तिन्ही संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या झालेल्या स्वतंत्र बैठकांनी मंजुरी देण्यात आली

स्टेट बँक विलीनीकरणा:-
* पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
* यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली
* एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या एकत्रित शाखांची संख्या २२,५०० तर एटीएमचे जाळे ५८,००० पर्यंत विस्तारणार आहे.
* स्टेट बँकेचे सध्या विविध ३६ देशांमध्ये १९८ कार्यालयांद्वारे अस्तित्व आहे.
* स्टेट बँकेच्या सध्या पाच सहयोगी बँका आहेत. स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्या मुख्य बँकेतील विलिनीकरणाचा प्रस्ताव मुख्य स्टेट बँकेने सरकारकडे सादर केला होता.
* याचबरोबर महिलांसाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये खास स्थापन करण्यात आलेल्या भारतीय महिला बँकेला ताब्यात घेण्याची इच्छाही या प्रस्तावाद्वारे प्रदर्शित केली होती.
* एकटय़ा स्टेट बँकेच्या देशभरात सध्या १६,५०० शाखा आहेत. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र (२००८) व स्टेट बँक ऑफ इंदूर (२०१०) या दोन सहयोगी बँकांचे यापूर्वीच मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे.
* भारतात सध्या सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment