आयोग/समिती/अहवाल:-
-------------------------------------------------------------------
व्ही. जी कन्नण:-
* सलग्न पाच बँकांना स्वत:त विलीन करून घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने संपूर्ण प्रकीयेसाठी १५ ते २० सदस्यांचा कृतीगट स्थापन केला आहे. या कृतीगटाचे अध्यक्ष म्हणून व्ही. जी कन्नणयांची निवड करण्यात आली आहे
इम्तियाझ मुर्तझा:-
* मथुरेत २ जूनला झालेल्या हिंसाचारात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण मारले गेले होते. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इम्तियाझ मुर्तझा यांच्या अध्यक्षेतेखाली नेमलेली समिती
शरद सूर्यवंशी:-
* महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून सखोल उपाययोजना करण्यात येण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी तीन सदस्यांची चौकशी नियुक्तची घोषणा केली.त्याचे अध्यक्ष म्हणून शरद सूर्यवंशी यांची निवड केली
मधुकर गुप्ता:-
* पाकिस्तानसोबत असलेली सीमारेषा अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली उच्चस्तरीय समिती. ही समिती केंद्र सरकारला सीमेवरील सुरक्षेसाठीच्या उपाययोजना सांगणार आहे.सीमेवरील गस्तीतील त्रुटी आणि धोकादायक ठिकाणे यांच्याबाबत मधुकर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करणार आहे
पी. के सिन्हा समिती:-
* केंद्रसरकारने ७व्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली समिती
ताहीर राय विशेष तपास पथक :-
* भारतातील पठाणकोठ येथील हवाई तळावर २ जानेवारी २०१६ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यानी हल्ला केला होता या हल्याचा तपास करण्यसाठी पाकीस्थानसरकारने नेमलेला आयोग
.
.
.
.
.
.
.
.
.
श्याम बेनेगल:-
* वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या केंर्दीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाची फेररचना करण्यासाटी श्याम बेनेगल यांच्या अध्य्क्षेतेखाली नेमलेला आयोग
* एस एम खान :-
आशीष शेलार:-
* दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देऊन त्याचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेली’ समिती
अमीताभ कुंडू:-
* मुस्लीम समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. राजेद्र सच्चर समितीच्या शिफारसीच्या अमलबजावणीचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेलि समिती
आ. जयंत पाटील व पंकजा मुंढे लवाद:-
*महाराष्ट्र शासनाने उसतोडणी मजुरांच्या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी नेमला होता. या लवादाने २० टक्के मजुरीत वाढ तसेच विमा योजना लागू करणे या शिफारशी केल्या होत्या
आर. व्ही. ईश्वर:-
*प्राप्तिकर कायदे सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने आर. व्ही. ईश्वर यांच्या अध्यक्षेतेखाली उच्चाधिकार समिती नियुक्त केली. वादग्रस्त पूर्वलक्ष्यी प्रभावी कराबाबतही ही समिती आपल्या शिफारशी सरकारला सादर करेल
* न्या. विष्णू सहाय्य तपास:-
* २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर ५० हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले होते. याप्रकरणी राज्य सरकारतर्फे न्या. विष्णू सहाय्य यांच्या नेतृत्वाखालील नेमलेला आयोग
( निष्कर्ष:- हजारो नागरिक बेघर होण्यास कारणीभूत ठरलेल्या मुझफ्फरनगरमधील दंगलीसाठी समाजवादी पक्ष व भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे या तपास आयोगाने म्हटले आहे)
* माधव मेनन समिती;-
सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जाहिरातीबाबत धोरण ठरविण्यासाठी स्थापन केलेली समिती (या समितीच्या अहवालानुसार सरकारी जाहिरातीमध्ये राष्ट्रपती,पंतप्रधान व सरन्यायाधीश यांचाच फोटो असली पाहिजे असा निर्णय १३ मे २०१५ रोजी दिला)
(अधिक माहितीसाठी वाचा स्टडी सर्कल तर्फे प्रकाशित असलेल्या चालू घडामोडी २०१६ )
No comments:
Post a Comment