चालू घडामोडी:-
----------------------------------------------------------
आयपीएल'प्रमाणेच तमिळनाडूमध्ये 'टीएनपीएल':-
• इंडियन प्रीमियर लिग‘ क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे.
• स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीएनपीएल आयोजित करण्यात येणार आहे
• उद्देश:-
• तमिळनाडूमधील खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे आयपीएल किंवा इतर कोणतीही टीम त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्यांचे भविष्य घडेल.
• क्रिकेट हा केवळ शहरातील खेळ असून चेन्नईपुरताच मर्यादित असल्याचे समज दूर होऊन तमिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यांत क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल
कौंटी क्रिकेटमध्ये विक्रम:-
‘* रॉयल लंडन’ एकदिवसीय स्पर्धेत प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात विक्रम केला गेला .इंग्लंडमधील सर्वोच्च भागीदारी आणि सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदला गेला.
* ट्रेंटब्रिज येथे आणि नार्दम्प्टनशायरविरुद्ध नॉटिंगहॅमशायरच्या रिकी वेसल्स आणि मायकेल लम्ब यांनी ३९.२ षटकांत ३४२ धावांची सर्वोच्च भागीदारी केली. वेसल्स ९७ चेंडूंत १४६ धावांवर बाद झाला. लम्बने कौंटीमधील विक्रमी १८४ धावांची खेळी केली. नॉटिंगहॅमशायरने ८ बाद ४४५ धावा केल्या. क्रिकेटविश्वादतील प्रथम श्रेणी सामन्यातील ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली.
* या सामन्यात ८७० धावा झोडपल्या गेल्या. यापूर्वी २००२मध्ये सरे विरुद्ध ग्लॅमर्गान सामन्यात ८७७ धावा फटकावल्या गेल्या होत्या.
* वेसेल्स आणि लम्ब यांच्या भागीदारीने इंग्लंडमध्ये विश्ववकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या सौरभ गांगुली-राहुल द्रविड यांची श्रीलंकेविरुद्धची ३१८ धावांची भागीदारी मागे टाकली. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली.
• ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल्स यांनी 2015 विश्व करंडक स्पर्धेत झिंबाब्वेविरुद्ध केलेली 372 धावांची भागीदारी अजूनही सर्वोत्तम आहे. प्रथम श्रेणीमधील विक्रमी धावसंख्या सरेच्या नावावर असून, त्यांनी 2007 मध्ये ग्लूस्टरशायरविरुद्ध 4 बाद 496 धावा केल्या
No comments:
Post a Comment