http://Vinupawar.blogspot.com
🔹युट्युब' काही मिनिटांसाठी झाले ' डाऊन '
सॅन ब्रुनो ( कॅलिफोर्निया) - गेल्या दहा पेक्षा अधिक वर्षांपासून कार्यरत गुगलची व्हिडिओ शेअरिंगसाठी असलेली " यु -ट्युब' ही वेबसाईट बुधवारी काही काळ बंद झाल्याचे समोर आले आहे . याबाबत युजर्सनी ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाल्यानंतर काही काळाने युट्युब पुन्हा पूर्ववत झाली .
युट्युब ही जगातील सर्वात मोठी व्हिडिओ शेअरिंग साईट आहे . युट्युब सुरु केल्यानंतर बुधवारी काही काळ "इंटरनल सर्व्हर एरर ' असा संदेश येत होता . मात्र एकाच वेळी ही समस्या जगभरातील किती देशांमध्ये जाणवत होती हे अजून स्पष्ट झालेले नाही . दहा वर्षांच्या इतिहासात युट्युब प्रथमच "डाऊन ' झाल्याच्या प्रतिक्रिया युजर्नसी व्यक्त केल्या. जेथे ही समस्या जाणवली तेथे युट्युबच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर " सॉरी , समथिंग वेंट रॉंग ' असा इंग्रजीतून संदेश दिसत होता . दरम्यान काही काळाने ही समस्या सोडविण्यात आली . मात्र अद्यापही कोणाला जर अशी अडचण आली तर ती सोडविण्यासाठी एक गट कार्यरत असून त्याबाबत संदेश पाठवावा , असे आवाहन " युट्युब ' तर्फे करण्यात आले आहे .
मागील महिन्यात भारतात युट्युबचे नवे डबिंग फिचर " स्मार्ट ऑफिस ' नावाने उपलब्ध झाले . भारतात सर्वाधिक मोबाईल युजर्स हे संध्याकाळपासून व्हिडिओ पाहायला सुरवात करतात . बहुतेक युजर्स नाममात्र डेटा रेट्सच्या योजनांचा लाभ घेतात .
🔹हे तुम्हाला माहिती आहे का?
युट्युबवर दररोज 400 कोटी व्हिडिओज पाहिले जातात.
प्रत्येक मिनिटाला युट्युबवर 300 तासांचे नवे व्हिडिओज अपलोड होतात .
मोबाईलवरून दररोज युट्युबवर 100 कोटी व्हिडिओज पाहिले जातात.
युट्युबला भेट देणारा युजर साधारणपणे 40 मिनिटे युट्युबवर खर्च करतो .
युट्युबला 2015 मध्ये केवळ जाहिरातींच्या माध्यमातून 428 कोटी डॉलर्स उत्पन्न मिळाले होते .
एक लाख पेक्षा अधिक सदस्य असलेले युट्युब 17 हजार चॅनेल्स आहेत.
http://Vinupawar.blogspot.com
No comments:
Post a Comment