🌷 *॥ दिनविशेष ॥* 🌷
●●●●●●●●●●●
🌻 *२२ जून २०१६* 🌻
【या वर्षातील १७४ वा दिवस 】
_*====s=====v=======m====*_
🌻 *१६३३* - गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.
🌻 *१७५७* - प्लासीची लढाई सुरू झाली.
🌻 *१८०५* - इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनीचा जन्मदिन.
🌻 *१८८७* - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्मदिन.
🌻 *१८९६* - नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्मदिन. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ’झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली.
🌻 *१८९७* - पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.
🌻 *१९०८* - इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.
🌻 *१९०८* - महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्मदिन.
🌻 *१९३२* - आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्मदिन.
🌻 *१९४०* - दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
🌻 *१९४०* - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
🌻 *१९४१* - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
🌻 *१९५५* - लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे यांचा मृत्यू.
🌻 *१९७६* - कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
🌻 *१९७८* - जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.
🌻 *१९९३* - चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचा मृत्यू. (पहिली मंगळागौर - लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट, सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा), रंगभूमीवरील अभिनेते.
🌻 *१९९४* - महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकऱ्यात महिलांना ३० टक्के आरक्षण.
🌻 *१९९४* - अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ यांचा मृत्यू. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
=================
✍✍✍ *सुविचार* ✍✍✍
*आधुनिक शिक्षकांनी जंगल व्यवस्थित करण्यापेक्षा वाळवंट फुलवण्याचे काम करावे*.
::_*क्लाइव्ह स्टेपल्स लुईस*_.
❄❄❄❄❄❄❄
■■■■■■■■
_*दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही*_. 👆
No comments:
Post a Comment