महत्वाचे संशोधन :
आलेक्झांडर फ्लेमिंगने 1928 साली पेनिसीलीन या अॅंटीबायोटिकचा शोध लावला होता.
दगडी कोळशापासून रासायनिक खत निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधण्यात आले आहे.
भारत सरकारही दगडी कोळशापासून रासायनिक खत निर्मिती करणार आहे.
मलेरिया प्रतिबंधक लस तयार करण्यासंबंधी भरीव योगदान असणारे मुंबई येथील टाटा मुलभूत संशोधन शास्त्रज्ञ - प्रा. गौतम जरोरी.
विजेच्या बल्बचा शोध शास्त्रज्ञ थोम्स अल्वा एडिसन ने 1879 साली लावला. बल्बमध्ये नायट्रोजन वायू भरलेला असतो.
जगातील पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अमेरिकेत हयूस्टन येथे 22 मे 2015 रोजी जेन्स बॉयसेन या रुग्णावर यशस्वी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर - मायकल क्लेबुक
आकाश अमृत - हवेतील बाष्पचे शोषण करून त्याचे शुद्ध पाण्यामध्ये रूपांतर करणारे हे यंत्र आहे. ही यंत्रे महाराष्ट्र शासन ग्रामीण भागात पाणी पुरवठयासाठी करत आहेत.
रेफ्रीजरेटरमध्ये वापरला जाणारा वायू - अमोनिया.
गोबरगॅसमध्ये सर्वात मुख्य घटक असतो - मिथेन
No comments:
Post a Comment