Sunday, 19 June 2016

Mpsc History

MPSC History:
📌भारत हा एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे  भारतवर्ष नाव पडले  तर वायव्येकडे वाहणा-या नदीस सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला  तर रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले.

भारताचे स्थान :-

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे  तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे  अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम  लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत

भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला  लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक.
________________________________________

No comments:

Post a Comment