Monday, 20 June 2016

STI विक्रीकर निरीक्षक परीक्षा काही उत्तरे :


STI  विक्रीकर निरीक्षक परीक्षा काही उत्तरे :

०१) प्रधानमंत्री जनधन योजना*
ब्रीद वाक्य - मेरा खाता भाग्य विधाता
सुरुवात - २८ ऑगस्ट २०१४

*ठळक वैशिष्टे*
- देशातील प्रत्येक कुटुंबाकडे बॅंक खाते असावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेची घोषणा स्वातंत्र्यदिनी केली होती.
- समाजातील सर्व घटकांना आर्थिक व्यवहारात समाविष्ट करून घेणे ज्या लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना बँक खाती उघडून दिले जाणार आहे.
- प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत बॅंक खाते उघडणाऱ्याला १ लाख रुपयांचे विमा कवच दिले जाणार आहे.
- २६ जानेवारी २०१५ पूर्वी या योजनेमध्ये सहभागी होऊन बॅंक खाते उघडणाऱ्याला आणखी ३० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
- खातेदाराला डेबिट कार्ड व्दारे १ लाख रुपये अपघाती विमा दिला जाणार आहे.
खाते धारकाला ५ हजार रुपये अधिकर्ष (Over Draft) सवलत दिली जाणार आहे.
- यात २८ ऑगस्ट २०१४ ते २६ जानेवारी २०१५ दरम्यानच्या काळातील खातेधारकांना ३० हजारांचा जीवन विमा दिला जाणार आहे.

०२) गार - सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम (General anti-avoidance rule)

०३) वर्गीकृत व्यापारी बँका २०१४ नुसार
सार्वजनिक क्षेत्रातील बँका - २६
खाजगी क्षेत्रातील बँका - २१
भारतातील विदेशी बँका - ४३
प्रादेशिक ग्रामीण बँका - ६४

०४) एच.आय.व्ही लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी रीटोनावीर  औषध वापरतात.

०५) सिडेराइट:- फूल्स गोल्ड (मूर्खाचे सोने)

०६) २६ ऑगस्ट २०१० रोजी स्टेट बँकेत स्टेट बँक ऑफ इंदोर विलीन करण्यात आली.

०७) वॉर कौन्सिल सभासद
केतकर - पुणे
आठल्ये - सातारा
पटवर्धन - रत्नागिरी
दस्ताने - भुसावळ

०८) २०२८ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या १.४५ अब्जचा टप्पा ओलांडून जाईल.

०९) एस ए ५३०:- लेखापरिक्षण नमुना

१०) Energy Units 1 kWh = 3.6 x 10 6 J (exact)

११) खगोलशास्त्राला समर्पित 'अ‍ॅस्ट्रोसॅट' ही भारताची पहिली वेधशाळा आहे.
- पीएसएलव्ही सी ३० प्रक्षेपकाच्या सहाय्याने, आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा प्रेक्षपण स्थळावरून ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ अवकाशात झेपावलं.
- अ‍ॅस्ट्रोसॅट’ ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अॅस्ट्रोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे अशा प्रकारचा उपग्रह लॉन्च करणारा भारत चौथा देश ठरला आहे.
- यापूर्वी अमेरिका, रशिया आणि जपानने अशा प्रकारची अंतराळ वेधशाळा लॉन्च केली आहे.

१२) जातीयवादाची सुरुवात:- जेम्स मिल

१३) भेटेन नऊ महिन्यांनी कवी कुंजविहारी
- १९२२ मध्ये गोरखपूरजवळच्या चौरीचौरा गावी क्रांतिकारकांनी उठाव केला. इंग्रजांनी अर्थात त्या क्रांतिकारकांचा बीमोड केला आणि अनेक तरुण मुलांना गजाआड केलं.
- त्या मुलांपैकी एकाला त्याच्या आईनं डोळ्यांत पाणी आणून विचारलं, ‘आता पुन्हा कधी भेटशील रे?’ आणि एक पाय फाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या त्या मुलानं उत्तर दिलं- ‘नऊ महिन्यांनी नक्कीच.’
- तो मुलगा विष्णू गणेश पिंगळे होता.
- लाहोरच्या तुरुंगात फासावर जाण्यापूर्वी त्यानं आपल्या आईसाठी असं म्हटलं होतं की, ‘आई, तुझ्या कष्टांची मला जाणीव आहे. पण या जन्मी माझं काम वेगळं होतं. या जन्मी मातृभूमीची सेवा केली. पण मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेऊन तुझं ऋण फेडीन.’

१४) झाशीच्या लढवय्या महिलांची फौज:-
- मोतीबाई - झाशीच्या राणीच्या हेर खात्याची प्रमुख
-ललीताबाई बक्षी - झाशीच्या राणीची दुसरी महत्वाची सरदार
- काशी -  राणी लक्ष्मीबाई प्रमाणे दिसणारी तिची दासी
- सुंदर - राणीने झाशी सोडल्यापासून सावलीप्रमाणे राणीच्या सोबत

१५) सिस्टर सुब्बलक्ष्मी १९११ मध्ये मद्रास मध्ये बी.ए ची पदवी घेणार्या पहिल्या हिंदू विधवा होत्या.

१६) ६३ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट- बजरंगी भाईजान
नर्गीस दत्त पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपट - नानक शाह फकीर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत (तनू वेड्‌स मनू अगेन)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण

१७) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 'रेल्वे अर्थसंकल्प २०१६' सादर केला
यात चार नवीन रेल्वे गाडयांची घोषणा केली
- अंत्योदय, हमसफर, तेजस आणि या रेल्वे गाडया नव्याने सुरु करण्यात येणार आहेत.
- सर्वसामान्य प्रवाशांसाठी अंत्योदय एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे. या गाडीमध्ये केवळ अनारक्षित डबे असणार आहेत.
- तर हमसफर एक्सप्रेस संपूर्णपणे वातानुकुलीत असणार आहे.
- तेजस ही जलद गाडी असणार आहे. या गाडीचा ताशी वेग १३० किलोमीटर असणार आहे.
- तर उदय गाडी ही डबल डेकर असून ही गाडी वातानुकुलीत असणार आहे. ही गाडी रात्रीच चालविण्यात येणार आहे.

संकलन
Vinupawar.blogspot.com

No comments:

Post a Comment