🔹
पीएसएलव्ही-सी34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 48 तासांचे काउंटडाऊन सुरू केले आहे.
बावीस जूनला सकाळी 9.26 वाजता येथील सतीश धवन अवकाशकेंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.
उड्डाणानंतर पन्नास मिनीटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी "इस्रो'चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.
यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्य होणार आहे.
अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे.
भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल. तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे.
प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटानंतर "पीएसएलव्ही'ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
याआधी पीएसएलव्ही-सी9 च्या साह्याने "इस्रो'ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते.
1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन
5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया)
एकाच वेळी सोडलेले उपग्रह
33 : रशिया (2014)
29 : नासा (2013)
20 : भारत (2016)
__________________________________
No comments:
Post a Comment