निधन:
-----------------------------------------
* कॉर्चनॉय :-
• दिग्गज बुद्धिबळपटू व्हिक्टतर कॉर्चनॉय यांचे निधन झाले.
• अस्तंगत सोव्हिएत संघराज्यास पटावरून तसेच पटाबाहेरून आव्हान दिल्यामुळे ते जास्त चर्चेत होते.
• व्हिक्ट र दी टेरिबल, असे संबोधले जाणारे कॉर्चनॉय यांचा खेळ आक्रमक होता.
•वयाच्या ७५ व्या वर्षीही ते जागतिक क्रमवारीतील अव्वल शंभर खेळाडूंत होते.
• त्यांनी २०११ मध्ये स्वीस स्पर्धाही जिंकली होती.
* मनोहर ऐच:-
• मि. युनिव्हर्स’ किताब पटकावणारे पहिले भारतीय शरीरसौष्ठवपटू मनोहर ऐच यांचे १०४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
• आशियाई सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनोहर यांनी १९५२ साली ‘मि. युनिव्हर्स’ हा किताब पटकावला.
• उंचीने ४ फूट ११ इंच असलेल्या मनोहर यांना ‘पॉकेट हक्र्युलस’ या टोपणनावाने ओळखले जायचे.
• बांगलादेश येथील कोमिल्ला जिल्ह्यात जन्मलेल्या मनोहर यांनी दिग्गज जादूगार पी. सी. सरकार यांच्यासह स्टंटमन म्हणून काम केले.
• दाताने स्टिलचा रॉड वाकवणे किंवा तलवारींवर झोपणे अशा करामतींवर त्यांचे प्रभुत्व होते.
• १९४२ साली ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी शरीरसौष्ठव खेळाकडे मोर्चा वळवला.
• १९९१ साली भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. –
सुलभा देशपांडे:-
• रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट व मालिका तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे (वय 80) यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.
• मुंबईत 1937 मध्ये जन्मलेल्या सुलभा देशपांडे यांनी छबिलदास बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कारकिर्दीला सुरवात केली. तेथे काम करतानाच विजय तेंडुलकर यांनी सुलभाताईंना मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले. त्याच काळात "रंगायन‘द्वारे त्या रंगभूमीशी जोडल्या गेल्या.
• अरविंद देशपांडे, अरुण काकडे आणि सुलभाताईंनी "आविष्कार‘ ही नाट्यसंस्था 1971 मध्ये सुरू केली. त्यांनी माधव साखरदांडे यांच्यासोबत "आविष्कार‘च्या "चंदशाला‘ या बालरंगभूमीची धुरा सांभाळली. "बाबा हरवले आहेत‘, "राजाराणीला घाम हवा‘ यांसारख्या बालनाटकांची त्यांनी निर्मिती केली. पार्वतीकुमार यांच्या मदतीने "दुर्गा झाली गौरी‘सारखे नृत्यनाट्य उभे केले. बालरंगभूमीच्या निमित्ताने देश-विदेशातील बालरंगभूमीचा अभ्यासही त्यांनी केला.
* सुलभाताईंनी अरुण काकडे यांच्या साथीने "आविष्कार‘ कार्यरत ठेवली. या नाट्यसंस्थेने जवळपास 175 नाटके रंगभूमीवर आणली. "रंगायन‘ आणि "आविष्कार‘ यांनी एकूण 250 नाटके रंगभूमीवर आणली.
•शांतता कोर्ट चालू आहे‘मधील बेणारे बाई, हल्लीच्या "मिसेस तेंडुलकर‘ या विनोदी मालिकेतील राणेआजी आदी अनेक भूमिका सुलभाताईंच्या अभिनयामुळे अजरामर झाल्या. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या.
* 73 हून अधिक चित्रपट
"जैत रे जैत‘, "चौकट राजा‘, "अवताराची गोष्ट‘ आदी मराठी चित्रपटांबरोबरच "विजेता‘, "सलाम बॉम्बे‘, "विरासत‘, "आदमी खिलौना है‘, "गुलाम ए मुस्तफा‘ आदी हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांतही त्यांनी काम केले. अस्मिता ही त्यांची शेवटची मालिका होती. जवळपास 73 हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले.
* अनेक पुरस्कारांनी गौरव
राज्य सरकारने नुकताच "नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार‘ देऊन त्यांचा गौरव केला होता. "एकता कल्चरल‘ या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाला होता. संगीत नाटक अकादमी, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा उचित गौरव झाला.
No comments:
Post a Comment