Vinupawar.blogspot.com
ब्रिटन 'स्वतंत्र'; युरोपीय महासंघाच्या बाहेर:-
-----------------------------------------------------------------
* युरोपीय महासंघात कायम रहावे अथवा नाही, यासाठी ब्रिटनमध्ये झालेल्या मतदानात येथील जनतेने युरोपीय महासंघाच्या बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
* ब्रिटनमधील 51.9 टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.
* आकडेवारी
72.2 टक्के : एकूण झालेले मतदान
51.9 टक्के : बाहेर पडण्याच्या बाजूने (1,74,10,742 मते)
48.1 टक्के : कायम राहण्याच्या बाजूने (1,61,41,241 मते)
* काही महत्त्वाच्या नोंदी
ब्रिटन हा महासंघाच्या बाहेर पडणारा ग्रीनलॅंडनंतरचा दुसरा देश
पंतप्रधान कॅमेरॉन यांचा राजीनाम्याचा निर्णय
जागतिक बाजारात पडझड; दिवसाच्या सुरवातीलाच 137 अब्ज पौंडांचा तोटा
* या मतदानाची आणि त्यानंतर झालेल्या परिणामाबाबतच्या महत्वाच्या बाबी
"ब्रेक्झिट‘ नावाने चर्चेत आलेले हे मतदान युकेतील 1992 नंतरचे सर्वांत मोठे मतदान ठरले.
* Brexit ‘ब्रेक्झिट’म्हणजे काय?
ब्रिटिश आणि एक्झिट या शब्दांना एकत्र करून ब्रेक्झिट हा शब्द तयार झाला आहे. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून एक्झिट असा त्याचा अर्थ होतो.
* ब्रिटनमध्ये पुन्हा जनमत चाचणी (Referendum) कशासाठी झाली?
* ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी ही जनमत चाचणी झाली. याआधी 2014 साली स्कॉटलंडनं ब्रिटनमध्ये राहावं की नाही, यासाठी जनमत चाचणी झाली होती.
* तर 1975 साली झालेल्या जनमत चाचणीत ब्रिटननं युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीत राहण्याच्या बाजूनं कौल दिला होता. पण त्यानंतरच्या काळाता युरोपियन राष्ट्रसंघटनेचं रूप बरंच बदललं आहे. हे बदल आजच्या ब्रिटनला मान्य आहेत का, हे पडताळून पाहण्यासाठी ही जनमत चाचणी होते आहे.
* युरोपियन युनियन काय आहे?
युरोपियन युनियन हा 28 देशांचा समूह असून, त्यात पश्चिम युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या मुख्य देशांचा समावेश आहे.या 28 देशांचे नागरिक इतर कुठल्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवास आणि व्यापार, नोकरी करू शकतात. त्यासाठी युरोपियन युनियनमध्ये युरो हे स्वतंत्र चलनही अस्तित्वात आहे
* ब्रेक्झिटची मागणी करणाऱ्यांची बाजू काय ?
* युरोपियन युनियनमध्ये ब्रिटन भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या तुलनेनं तगडा देश आहे. पण इतर युरोपियन देशांतून आलेल्या स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा ‘leave’ कँपेनचा दावा आहे. युरोपियन युनियनपेक्षा वेगळं झाल्यास ब्रिटन अधिक सुरक्षित बनेल असं त्यांना वाटतं.
*युरोपात येणारे निर्वासितांचे लोंढे ब्रिटनपर्यंत येऊ नयेत अशा भावनेतूनही अनेकजण ब्रेक्झिटला पाठिंबा देतायत.ब्रिटनला युरोपियन युनियनच्या सदस्यत्वापोटी वर्षाला सुमारे 99 हजार कोटी रुपये द्यावे लागतात, ते पैसेही वाचतील असा या गोटाचा दावा आहे.
* ब्रेक्झिटला विरोध करणाऱ्यांची बाजू काय आहे?
युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाल्यापासून ब्रिटनमधल्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाल्याचं ‘remail’ गटाचं मत आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास भाजीपाल्यासह अनेक गोष्टी महाग होतील, टॅक्स वाढेल असं या गोटातील लोकांना वाटतं. युरोपियन युनियनमधून वेगळं झाल्यास जवळपास दहा लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते.सुरक्षेच्या मुद्दयावरही ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहणं हीताचं ठरेल असं युरोपियन युनियन समर्थकांना वाटतं. तसंच एकसंध युरोपमुळं देशादेशांतले तंटे आणि युद्धाची भीती नष्ट झाल्याचंही ते नमूद करतात.
* ब्रिक्झिटचे भारतावर होणारे परिणाम
* युरोपियन युनियन ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्यांसाठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
* जवळपास 800 हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनमधून होते.
* ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
* ब्रेक्झिटमुळे युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वधारू शकतो. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल. तर जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम होईल.
युरोपियन युनियनमधून वेगळं झाल्यामुळे ब्रिटनचा पैसा वाचेल, पण जवळपास दहा लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते.
हे सारं काही एका झटक्यात होणार नाही, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालवधी लागेल. पण या निकालामुळे युरोपचं आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
Vinupawar.blogspot.com
No comments:
Post a Comment