Saturday, 18 June 2016

New updates

19. 06. 2016

१)  अणुपुरवठादार गटात  भारताला सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावास रशियाने शनिवारी पाठिंबा दिला.

२)  कृत्रिम पावसाबाबत चीन आणि भारत सरकारमध्ये चर्चा सुरु, चीनी तज्ज्ञ भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांना आधुनिक  प्रशिक्षण देईल.

३)  RBI गव्हर्नर रघुराम राजन दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत. RBI कर्मचाऱ्यांना लिहिले निरोपाचे पत्र

४)  मान्सून महाराष्ट्रात दाखल; पूर्व विदर्भातून अनपेक्षितपणे घेतली एन्ट्री!

५)  9 वी आणि 11 वीच्या बोर्ड परीक्षा नाहीत, आता ज्या पद्धतीने परीक्षा होत आहेत, त्याच पद्धतीने होणार - शिक्षणमंत्री.

६)  फरार आरोपी मल्ल्या लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा अतिथी ;भारत सरकारचा उच्चायुक्तही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद.

७)  एकेकाळची बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात, रेड कॉर्नर नोटीस जारी.

८)  भारत - झिम्बाम्बे टी 20 सामना :- झिम्बाम्बेचा 2 धावांनी विजय.

९)  जर्मनीचा १९ वर्षीय युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव याने अव्वल मानांकित रॉजर फेडरर याला हाले ग्रासकोर्ट टुर्नामेंटच्या उपांत्य लढतीत पराभवाचा धक्का देण्याची किमया केली

No comments:

Post a Comment